युद्धाच्या काळात सैनिकांच्या रक्षणासाठी देवतांच्या उपासनेने भारित केलेले दोरे त्यांना उपलब्ध करणारे कंबोडियातील राजे !
मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात असलेल्या भिंतींवर अनेक शिल्पे आहेत. त्यांत मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे आणि उजवीकडे युद्धाची दृश्ये कोरलेली आहेत. यामध्ये खमेर सैनिक (कंबोडिया) आणि चंपा सैनिक (व्हिएतनाम) यांच्यात झालेल्या युद्धाची दृश्ये, खमेर सैनिकांच्या साहाय्याला आलेले चिनी सैनिक, अशा अनेक दृश्यांचा समावेश आहे.