मलेशियातील बटू गुहेत असलेले कार्तिकेयाचे विश्वप्रसिद्ध जागृत मंदिर !
प्राचीन काळी ज्याला ‘मलय द्वीप’ म्हटले जात होते, तो म्हणजे आताचा मलेशिया देश. मलेशिया हा अनेक द्विपांचा समुच्चय आहे. मलय भाषेत अनेक संस्कृत शब्दांचा उपयोग केला जातो. मलय साहित्यात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचा संबंध दिसून येतो.