राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी समस्त हिंदु संघटनांच्या वतीने श्रीरामनामदिंडी !

राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी कोल्हापूर शहरात श्रीरामनामदिंडी काढण्यात आली.

सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय ! – श्री महंत कृष्णदासजी महाराज, श्री पंच दिगंबर अनी आखाडा

‘सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे’, असे गौरवोद्गार श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत कृष्णदासजी महाराज यांनी काढले.

भाग्यनगर येथील ‘हैद्राबाद बूक फेअर’मध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रतिदिन सहस्रो जिज्ञासूंनी भेट दिली. या ठिकाणी एकूण ३५० प्रदर्शनांचे कक्ष लावण्यात आले होते. यात सनातनचे प्रदर्शन जिज्ञासूंसाठी प्रमुख आकर्षण ठरले.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित युवा शिबीरात सहभागी झालेल्यांचा धर्मप्रसाराच्या कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचा निर्धार !

सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या सेवा केंद्रात चार दिवसीय ‘युवा शिबिर’ पार पडले.

लासलगाव (जिल्हा नाशिक) : युवकांना व्यसनाच्या आहारी ढकलणार्‍या सनबर्न फेस्टीव्हलला हिंदुत्वनिष्ठांचा विरोध !

 पाश्चात्त्य चंगळवादाला खतपाणी घालणा-या, हिंदु संस्कृतीला घातक असणा-या आणि युवक-युवतींंनी व्यसनाच्या आहारी ढकलणा-या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला अन् हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या षड्यंत्राला येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला.

मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्माते दाखवतील का ? – डॉ. दिक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

लव्ह जिहाद चित्रपटसृष्टीत पहिल्यापासून आहेच. त्याचाच परिपाक असणारा केदारनाथ हा चित्रपट म्हणजे त्याची परिसीमाच म्हणावी लागेल. मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखवले असते का, असा प्रश्‍न सनातन संस्थेच्या डॉ. दिक्षा पेंडभाजे यांनी उपस्थित केला.

हिंदूंच्या तीर्थस्थळांचा अवमान करणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदूंची एकमुखी मागणी

‘केदारनाथ’ या आगामी हिंदी चित्रपटाचे नाव, पोस्टर, ‘ट्रेलर’ आणि ‘टीझर’ यांतून हा चित्रपट हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते.

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्थानिक दत्त चौकात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या वेळी ३०० हून अधिक हिंदूंनी स्वाक्षर्‍यांद्वारे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. आंदोलनातील विषय ऐकून जिज्ञासू स्वाक्षरी करण्यासाठी येत होते.

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्यातच मनुष्य जीवनाची सफलता ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती होत आहे. त्यामुळे हिंदु धर्माचे धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यानेच जीवन सफल होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.

शबरीमला देवस्थान हा केवळ केरळी लोकांचा विषय नसून समस्त हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सरकार शबरीमला मंदिरात परंपरेच्या विरोधात जाऊन महिलांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करत आहे, जे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार चुकीचे आहे.