सनातनचे हितचिंतक प्रदीप किणीकर यांच्याकडून सांगली येथील महात्मा गांधी ग्रंथालयासाठी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित २२ ग्रंथ भेट !

सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रदीप किणीकर यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले २२ ग्रंथ (२ सहस्र ४० रुपये) प्रायोजित करून ते महात्मा गांधी ग्रंथालयासाठी भेट म्हणून दिले. या ग्रंथांमध्ये अग्निहोत्र, स्वभावदोष निर्मूलन, प्रथमोपचार, पाल्याचे उत्तम संगोपन आणि विकास यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ यांचा समावेश आहे.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला गोवा राज्य आणि सोलापूर (महाराष्ट्र) येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ म्हणून राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत असून समाजातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी

पंजाबमधील युवापिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा सिनेमाही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’, ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत.

सनातनने मठ-मंदिरे यांच्या सुव्यवस्थापनाचे शिक्षण द्यावे ! – श्री. संजय शर्मा

आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे. आश्रमात घडलेले साधक मंदिरांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे सनातनने ‘मठ-मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’, याचे शिक्षण समाजाला द्यावे, असे मत ‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय शर्मा यांनी व्यक्त केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गुरुपूजन !

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, अशा एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन केले.

सूक्ष्मातील जाणण्याची अलौकिक क्षमता असलेले उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !

उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांनी २ डिसेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. वैभव माणगावकर यांनी त्यांना आश्रमात चालणा-या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.

वाद्यांची निर्मिती का केली ?

ईश्वराने सृष्टीच्या पालन-पोषणाच्या दृष्टीने संगीताच्या माध्यमातून सर्व जिवांना आवश्यक अशी त्याची शक्ती देण्यासाठी निरनिराळ्या वस्तू आणि वाद्ये यांची निर्मिती केली.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२७ मे ते ८ जून या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

‘अधिवक्ता अधिवेशना’साठी आलेल्या बेंगळूरू, कर्नाटक येथील मान्यवर अधिवक्त्यांनी गोव्यातील रामनाथी आश्रम पाहिल्यावर दिलेले अभिप्राय

‘इतर ठिकाणांच्या तुलनेत आश्रमातील वातावरण अत्यंत वेगळे आहे. येथे शांतता आहे. येथे अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असून कोणालाही ती अनुभवायला येईल. मी यापूर्वी २ वेळा आश्रमात आलो होतो. या वेळी ‘पूर्णवेळ साधना करणार्‍यांची संख्या वाढली आहे’, असे मला दिसले.

अमरावती येथे सनातन संस्थेच्या वतीने साधनाविषयक प्रवचन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ५ ठिकाणी ‘साधना’ या विषयावर विषयक प्रवचने घेण्यात आली.