नवरात्री निमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री शाकंभरीदेवी याग !

नवरात्रीनिमित्त आदिशक्ति जगदंबेच्या उपासनेसाठी गोवा येथील सनातन आश्रम मध्ये ३ ऑक्टोबर या दिवशी शाकंभरीदेवी यागाला आरंभ झाला.

शारदीय नवरात्री निमित्त पुणे आणि चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ यांचे प्रदर्शन !

शारदीय नवरात्र ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाले. या निमित्ताने पुणे येथील जागृत देवस्थान श्री चतुःश्रृंगीदेवी येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्‍या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज

नातनचा गोवा येथील आश्रम म्हणजे साक्षात् वैकुंठच आहे. भोगभूमी अशा कलंकित नावाने ओळखल्या जाणार्‍या गोवा राज्यात एवढा सुंदर आश्रम उभारणार्‍या महापुरुषाला माझे नमन ! अशा महापुरुषाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले, तरी ते अल्पच पडतील, असे आशीर्वचन चित्रकूट (मध्यप्रदेश) येथील भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज यांनी दिले.

गुजरात येथील ‘कर्णावती समन्वय परिवार गुजरात’ या संस्थेकडून उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सनातन संस्थेचा सन्मान !

उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी सनातन संस्थेचा सन्मान भाजपशासित गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेचे गुजरात येथील साधक श्री. चंद्रशेखर कद्रेकर यांचा शाल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून झाला प्रसार !

कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सव निमित्त प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी येथील ‘एफ् १२५ सेक्टर १०’ येथे जिज्ञासू मीनू शर्मा यांच्या घरी ‘श्री गणेशोत्सवाचे शास्त्र’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

नामस्मरणाने विद्यार्थ्यांचा तणाव न्यून होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते !- सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

सध्या विद्यार्थ्यांसाठी तणाव ही विशेष समस्या झाली आहे.

वाराणसीमध्ये (उत्तरप्रदेश) विविध ठिकाणी ‘तणावमुक्ती नियंत्रण’ विषयावरील प्रवचनांना शिक्षकांचा चांगला प्रतिसाद

तणावासारख्या सार्वत्रिक समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे.

फ्रान्सच्या सीनेटमध्ये ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सन्मान !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ५ जून २०२४ या दिवशी फ्रान्सच्या सीनेटमध्ये (संसदेमध्ये) ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथे विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.