गेग्रेरियन दिनदर्शिकेनुसार नववर्ष साजरे करण्याला कुठलाही ठोस आधार नाही ! – आचार्य अशोककुमार मिश्र, अध्यक्ष, वर्ल्ड ॲस्ट्रो फेडरेशनचे एशिया चॅप्टर, बिहार

ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, त्या शुभ दिवशी हिंदु नववर्ष साजरे केले जाते. या दिवशी नववर्ष साजरे करणे वैज्ञानिक, प्राकृतिक आणि सामाजिक दृष्टीने योग्य आहे, तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा उत्तम आहे; मात्र गेग्रेरियन दिनदर्शिकेनुसार नववर्ष साजरे करण्याला कुठलाही ठोस आधार नाही.

हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु स्त्री धर्मशिक्षित असल्यास तिचे पूर्ण कुटुंब धर्माचरणी होते, हे राजमाता जिजाऊंनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे हिंदु स्त्रियांनी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक आहे. असे झाल्यास ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटापासून कुटुंबाचे रक्षण होईल.

साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या ! – काशिनाथ प्रभु, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधना केल्यास जीवनात येणार्‍या अडचणींपैकी ८० टक्के समस्यांना उत्तर मिळतेच; म्हणून साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु यांनी केले.

कळंबोली येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलेश कोठारी यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट !

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजपचे संघटक श्री. कमलेश कोठारी यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात करण्यात येणार्‍या विविध सेवांविषयी जाणून घेतले.

जैन संप्रदायाचे पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

चौक (जिल्हा रायगड) येथून पायी चालत सकाळी ८ वाजता पू. महाराजांचे आश्रमात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेचे साधक उपस्थित होते. आश्रमदर्शनाच्या वेळी पू. विनम्रसागरजी महाराज आणि त्यांचे सर्व शिष्य यांनी जिज्ञासेने आश्रम पाहून त्यानुसार काही प्रश्नसुद्धा विचारले. आश्रम भेटीनंतर आश्रमातील पूर्णवेळ साधना करणार्‍या काही साधकांसमवेत त्यांनी आस्थेने संवाद साधला.

सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक !

खडकवासला ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ २२ मार्च या दिवशी पार पडली. सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.

‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या विद्यमाने एका विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाचा देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

समाजातील प्रत्येक कुटुंब आनंदी होण्यासाठी प्रयत्नरत रहायचे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

योग्य साधना केल्यावर देव कसे साहाय्य करतो आणि आपल्या जीवनात कसे आमुलाग्र पालट होतात, ते आपण प्रत्येकाने साधना सत्संगाच्या माध्यमातून अनुभवले. सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा केल्यावर आपले कुटुंब आनंदी झाले.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

आपल्याला यापुढील काळात जे हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यातील पहिली पायरी साधना आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले.

सनातन संस्थेच्या साधकांनी ‘जे के योग’चे प्रवर्तक स्वामी मुकुंदानंदजी यांची घेतली सदिच्छा भेट !

तुलसी भवनामध्ये स्वामी मुकुंदानंदजी यांचे ५ दिवस प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी स्वामी मुकुंदानंदजी यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले आणि संस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिले.