सांगली जिल्ह्यात सनातन संस्था द्वारा ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

येथे सकाळी झालेल्या उत्सवात पू. राजाराम नरुटे यांची वंदनीय उपस्थिती होती, तर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. येथे १८० जिज्ञासू उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला !

जिल्ह्यात ठाणे येथे २ ठिकाणी, तसेच डोंबिवली आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी एक असे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा लाभ ५०० हून अधिक जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम सात्त्विक, पवित्र आणि दैवी आहे. येथे असतांना ‘मी सकारात्मक ऊर्जेच्या विश्वात आहे’, असे मला वाटले. मला सनातनच्या (राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या) कार्यात सहभागी व्हायचे आहे.’

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये देहली, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

गुरूंविषयी श्रद्धा, भक्तीभाव निर्माण करा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.

(निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार यांची सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमास भेट !

सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून मला मनःशांती मिळाली आणि नवचैतन्यदायी ऊर्जा प्राप्त झाली.’

संभाजीनगर, जालना, धुळे, नंदुरबार येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

‘ध्यानमंदिरात ध्यानास बसल्यावर आवरण अल्प झाले ’, असे वाटले. नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली आणि ‘मन हलके झाले’, असे जाणवले.’