साधना केल्यास प्रत्येक हिंदूचे कुटुंब आनंदी होईल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
अनेक हिंदूंच्या घरांमध्ये धर्माचरण होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समस्यांवरील उपायांविषयी हिंदूंना कुठेही दिशा दिली जात नाही. याचा परिणाम हिंदूंच्या व्यावहारिक, कौटुंबिक आणि धार्मिक गोष्टींवर होत आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केल्यास त्याचे कुटुंब आनंदी होईल.