श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग) येथील दत्तमंदिरात वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीपूर्वी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते झालेले सनातनच्या प्रदर्शन कक्षांचे उद्घाटन !

व्यष्टी साधना चांगली झाल्यावर समष्टी सेवाही चांगली होते आणि आनंद मिळतो. गुरूंचे मन जिंकण्याची गोष्ट म्हणजे सेवा ! प्रत्येक सेवा परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांजवळ जाण्यासाठीच असून सेवा परिपूर्ण केल्यास ती ईश्वरचरणी रुजू होते. त्यामुळे साधकांनी परिपूर्ण सेवा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

भोर येथील ‘सुभाष इंजिनीयरिंग वर्क्स’ या आस्थापनात ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आनंद शोधत असतो, तो मिळवून आनंदी जीवन जगायचे असेल, तर प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. शशांक मुळे यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

सनातनच्या साधकांसारखी प्रसन्नता तात्काळ आत्मसात् करायला हवी ! – सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर

देवाच्या घरी आल्यावर देव जसा सन्मान करेल, तसा इथे झाला. सगळीकडे साधक असतात; परंतु सनातनच्या आश्रमात देवासारखी माणसे गुरुदेवांनी निर्माण केली आहेत. व्यष्टी साधनाही नीट न करणा-यांसाठी समष्टी साधना करणा-यांनी अतिथी म्हणून सर्व काही करावे, ही पुष्कळ विशेष गोष्ट आहे.

धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला सुरक्षित रहातील ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था

इराणमधील मुसलमान महिलांनी हिजाबला कडाडून विरोध केला आहे. काही तथाकथित उदारमतवादी षड्यंत्राद्वारे हिजाबला पाठिंबा देत आहेत. नारीशक्ती एकत्रित आली, तर काय होऊ शकते, हे जगभरातील महिलांकडून हिजाबला होत असलेल्या विरोधातून लक्षात येत आहे.

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील देव दीपावलीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सन्मान

देव दीपावलीचा कार्यक्रम सूरजकुंड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांचा पुष्पहार अन् स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट

मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, तसेच स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर आणि संशोधक श्री. धनंजय शिंदे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड’कडून लक्ष्मीपूजनाचे शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण !

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड, (डी.एस्.पी.पी.एल्.), भोरपवणे’ यांच्या वतीने २४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्यामागील शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.

साधना करून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करणे, यांसाठी मनुष्यजन्म मिळालेला असतो. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे.

२८ व्या निवासी कीर्तन शिबिरात सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर म्हणाले, ‘‘आधुनिक विज्ञानातील संशोधनापेक्षा भारतियांनी केलेले संशोधन हे अतीप्रगत आणि परिपूर्ण आहे. पाश्चात्त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सहस्रो वर्षे आधी ऋषिमुनी आणि महर्षी यांनी अतीप्रगत आणि परिपूर्ण संशोधन केलेले आहे.