सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !

सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत रक्षाबंधन साजरे !

डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.

कलियुगात ‘नामस्‍मरण’ ही सर्वश्रेष्‍ठ साधना ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्‍यात्‍माचे आचरण केल्‍यानेच प्राप्‍त होतो. जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांचे मूळ कारण हे आध्‍यात्मिक असते.

मिरज येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्‍साहात पार पडले !

येणार्‍या आपत्‍काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्‍ध न झाल्‍यास उपचार करण्‍यासाठी बिंदूदाबन लाभदायक होऊ शकते. त्‍यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने मिरज येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्‍यात आले.

कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज् संस्‍थेच्‍या वतीने आयोजित महोत्‍सवात सनातन संस्‍थेचे सात्त्विक उत्‍पादने आणि ग्रंथ प्रदर्शन !

या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज्‌चे संस्‍थापक तसेच बळीराज सेनेचे अध्‍यक्ष श्री. अशोकदादा वालम यांना सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देण्‍यात आला.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेत कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक संत, सनातन संस्था

आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो.

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतरही अनेक ठिकाणी हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चाद्वारे हिंदूंनी याविरोधात रोष व्यक्त करूनही अशा घटना थांबवण्यास सिद्ध नाहीत. धर्माचरण आणि साधना हेच समस्येसाठी मूळ उत्तर असल्याने ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले

राष्ट्रनिर्माणासाठी त्याग आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रती निष्ठा आवश्यक ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ लागेल आणि ते साधनेद्वारेच प्राप्त होईल. समष्टी साधना करण्यासाठी आवश्यक बळ व्यष्टी साधनेने प्राप्त होईल आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या राष्ट्रसेवेतून ईश्वरप्राप्ती करता येईल.