ईश्वरावर दृढ श्रद्धा आणि विविध दैवी गुणांनी युक्त असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) संतपदी विराजमान !
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात, शांत, समाधानी वृत्ती आणि देवाच्या कृपेसाठी तळमळणार्या श्रीमती कुसुम जलतारे (वय ८० वर्षे) या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.