रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !
हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात २ एप्रिल २०२२ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात २ एप्रिल २०२२ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे. आश्रमात घडलेले साधक मंदिरांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे सनातनने ‘मठ-मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’, याचे शिक्षण समाजाला द्यावे, असे मत ‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय शर्मा यांनी व्यक्त केले.
सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, अशा एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन केले.
सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या विधीच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहूया.
अक्षय्य तृतीया हे अविनाशी तत्त्वाचे प्रतीक आहे. या शुभदिनी (१४.५.२०२१ या दिवशी) सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली.
रामनाथी (गोवा) – हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात १३ एप्रिल २०२१ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले. गुढीचे पूजन सनातन पुरोहित पाठशाळेचे कु. विश्व अय्या यांनी केले. या वेळी … Read more
उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांनी २ डिसेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. वैभव माणगावकर यांनी त्यांना आश्रमात चालणा-या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.
व्यसनमुक्ती आणि षड्विकार निर्मूलन या उदात्त हेतूंनी देवद गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केल्या जाणा-या ‘हरिनाम दिंडी’चे मार्गशीर्ष शुक्ल पक्षपंचमीला (१ डिसेंबर) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले.
२७ मे ते ८ जून या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘इतर ठिकाणांच्या तुलनेत आश्रमातील वातावरण अत्यंत वेगळे आहे. येथे शांतता आहे. येथे अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असून कोणालाही ती अनुभवायला येईल. मी यापूर्वी २ वेळा आश्रमात आलो होतो. या वेळी ‘पूर्णवेळ साधना करणार्यांची संख्या वाढली आहे’, असे मला दिसले.