दत्त जयंती २०२३ निमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे येथे विविध ठिकाणी लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच विविध प्रतिष्ठितांची भेट !
दत्त जयंती निमित्त सातारा, वाई, कराड, कोरेगाव येथे सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्म प्रसार !
१. श्री दत्त मंदिर, पळशी, कोरेगाव, सातारा कार्यवाहक श्री पिसाळ महाराज
२. कोरेगाव येथे आमदार श्री. महेश शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ. प्रिया महेश शिंदे यांची प्रदर्शनाला भेट
दत्त जयंती २०२२ निमित्त सनातन संस्थेचे ठिकठिकाणी ग्रंथ-उत्पादन प्रदर्शन !
दत्त जयंती २०२२ निमित्त सनातन संस्थेने ठिकठिकाणी ग्रंथ-उत्पादन प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनांना मान्यवर आणि जिझासू यांनी भेट देऊन चांगला प्रतिसाद दिला.
इंदूर येथील ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेचा सहभाग
सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या दिवशी बांगर (देवास) आणि इंदूर येथे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फ्लेक्सचे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. बांगर येथे १० डिसेंबरला झालेल्या भंडार्यातही हे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांची भेट
अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांनी भेट दिली.
देहली येथे दत्त जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन
दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील जनकपुरीच्या दत्तविनायक मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दत्त जयंती निमित्त ठाणे जिल्ह्यात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर यांच्या भेटी
ठाणे येथे दत्त जयंती निमित्त ३३ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. त्यांपैकी काही ठिकाणच्या प्रदर्शनांना विविध मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या.
दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनाचा सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ !
दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘देवालय दर्शन’, ‘साधना’, ‘धर्माचरण’, यांविषयी मार्गदर्शन करणार्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच सनातनच्या विविध विषयांवरील अनमोल ग्रंथ आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचा वितरण कक्षही उभारण्यात आला.