वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन ; सनातन संस्थेचा सहभाग

येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी तहसील चौक, वणी येथे १६ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वडोद (जिल्हा संभाजीनगर) येथील मंदिरात कठोर साधना केलेले नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचा सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

संभाजीनगर येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी पू. महाराजांना सनातनचे पंचांग भेट दिले आणि सनातनच्या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.

सनातनच्या कार्याला निश्‍चितपणे सहकार्य करू ! – सौ. शशिकला बत्तुल, उपमहापौर, सोलापूर

आम्ही जे करतो, तेथे स्वार्थ आहे; मात्र तुम्ही निःस्वार्थपणे कार्य करत आहात. तुमच्या कार्यासाठी शक्य ते सहकार्य मी निश्‍चितपणे करीन, असे प्रतिपादन येथील उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल यांनी केले.

रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे गणेशपूजनाविषयीच्या अध्यात्मशास्त्र या विषयावरील प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने येथील श्री ॐ सेवाभावी संस्था यांच्या मंडळात २५ ऑगस्टला सामूहिक गणेशाचा नामजप आणि ‘गणेश पूजनाविषयीचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन पार पडले.

जळगाव पिपल्स बँकेत ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ विषयावर प्रवचन

जळगाव शहरातील प्रख्यात जळगाव पिपल्स बँकेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ आणि ‘भारतीय सण-उत्सवामांगील विज्ञान’ या विषयांवर व्याख्यान घेण्यात आले.

सनातन संस्थेचे साधक आणि आम्ही एकच आहोत ! – डॉ. कौशिक मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा

सनातन संस्थेला भेटण्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते की, अशीही एक संस्था आहे जी धर्मशास्त्राच्या आधारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.