बारामती येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम

बारामती (जिल्हा पुणे) येथे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संक्रांत या सणाविषयी माहिती देणारे चलचित्र (व्हिडिओ) महिलांना दाखवण्यात आले.

युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे सनातनच्या सेवाकेंद्रात युवा शिबीर

जळगाव येथील सनातनच्या सेवाकेंद्रात २६ ते २९ जानेवारी या कालावधीत युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने युवा शिबीर घेण्यात आले. त्यात नाशिक, जळगाव, संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, धुळे येथील युवा साधकांनी सहभाग घेतला.

सनातनच्या धर्मरथाच्या माध्यमातून अमरावती येथे अध्यात्मप्रसार

अमरावती शहर, मोर्शी आणि मूर्तीजापूर गावांमध्ये सनातनच्या धर्मरथाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. मूर्तीजापूर गावात ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष चंदन अग्रवाल, भाजप शहराध्यक्ष भारत भगत, तसेच स्थानिक ज्येष्ठ समाजसेवक कमलाकर गावंडे यांनी धर्मरथाचे पूजन करून प्रसारकार्याला प्रारंभ केला.

याज्ञवल्क्य मठाचे प.पू. श्री श्री श्री १००८ विद्यावारिधीतीर्थ स्वामीजी यांची नगर येथील सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट

कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन पाहून स्वामीजींनी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी ‘‘कर्नाटकमध्ये झालेल्या समितीच्या सभेला मी गेलो होतो. समितीने संघटन चांगले केले आहे. तुमच्या गुरुदेवांना हा प्रसाद द्या आणि हे अर्पणरुपी आशीर्वाद द्या’’, असे म्हणून ५० रुपये आणि खडीसाखरेचा प्रसाद दिला.

सनातन संस्थेचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवे ! – संतोष वर्तक, अध्यक्ष, सह्याद्री सामाजिक संस्था

कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स येथे सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथावर सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या विक्रीकेंद्राचे उद्घाटन सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष वर्तक आणि भाजपचे पनवेल शहर चिटणीसपदावर श्री. अशोक मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

सोलापूर येथील ज्ञानप्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेकडून सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक !

सोलापूर येथील मासाळनगर, विजापूर रस्ता, ज्ञानप्रबोधन शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था

वयाच्या नव्वदीतही वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजींना वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ होती. ते सतत अध्ययन करत असत. वेदांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. अनेक मान-सन्मान मिळवूनही त्यांना वृथा अभिमान नव्हता. मित आहार आणि स्वावलंबन हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

वडनेरभैरव (नाशिक) येथे मकरसंक्रांतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचन

वडनेरभैरव (नाशिक) येथे एकता ग्रुपच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वसुधा चौधरी यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि लाभ तसेच धर्मशिक्षणाचे महत्त्व या विषयावर प्रवचन घेतले.

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे मकरसंक्रांतीनिमित्त प्रवचन

अंबाई नगर येथे १९ जानेवारीला सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मकरसंक्रात आणि धर्माचरण, तसेच कुलदेव आणि दत्त यांच्या नामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.

“हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन सनातन संस्थेचे साधक कार्य करत आहेत !” – नैमिष सेठ, रा.स्व. संघ

सनातनच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतांना नैमिष सेठ म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे साधक या अधिवेशनात उपस्थित आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन ते कार्य करत आहेत. त्यांना भेटून आनंद झाला.’’