सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील ईश्‍वरी चैतन्यामुळे इंडोनेशियामध्ये लोक त्यांच्याकडे स्वत:हून आकर्षिले जाणे !

‘योग्यकर्ता’ या शहरात सुलतानाच्या राजवाड्यात गेल्यावर तेथील महिला गाईडने सद्गुरु काकूंकडे पाहिले आणि ‘तुम्ही ‘राणी’सारख्या दिसता’, असे म्हटले.

इंडोनेशिया येथील अभ्यास दौर्‍याचा वृत्तांत

इंडोनेशिया देशातील बाली बेटात हिंदू बहुसंख्येने रहतात. तेथे हिंदूंचे सर्व सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात; मात्र हे सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. गुढीपाडव्याचा सण नववर्षारंभ म्हणून ‘न्येपी’ या नावाने साजरा केला जातो.

जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विचार यांपासून रक्षण करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

आज हिंदू पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘नारीशक्ती’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात केले.

गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून मनापासून साधना करणे आवश्यक ! – रमानंद गौडा, सनातन संस्था

सध्या आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून राबवणे क्रमप्राप्त आहे. अंतःकरण शुद्धी झाली, तरच आपण भगवंताच्या समीप जाऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावलेले सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी अन् ग्रंथांचे कौतुक

कल्याण येथील श्री शंकर मंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी भेट दिली. त्यांनी सनातनच्या ग्रंथांची माहिती जाणून घेत ग्रंथ खरेदीही केली.

सनातनचे कार्य चांगले आहे, ते चालूच ठेवा ! – केंद्रीयमंत्री अनंत कुमार

बेंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त, म्हणजेच १३ फेब्रुवारीला सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्या प्रदर्शनाला केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी नुकतीच भेट दिली.

सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त देशभर ६५० हून अधिक ठिकाणी धर्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये ६५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्यांचे वितरण कक्ष, तसेच शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला.

नागपूर येथे धर्मरथावरील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

४ फेब्रुवारीला रुद्रशक्ति एनक्लेव्ह, मनिषनगर, नागपूर येथे सनातनच्या धर्मरथाच्या (सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांचे फिरते वितरणकेंद्र) माध्यमातून राष्ट्ररक्षण, धर्मजागृतीविषयक, तसेच अध्यात्मशास्त्र सुलभ भाषेत सांगणारे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

सनातन संस्थेचे हिंदुत्व जागृतीचे कार्य योग्य असून प्रभावी आहे ! – ह.भ.प. जयराम हरि पुरंदरे

सनातन संस्थेने हिंदुत्व जागृतीकरता जे आध्यात्मिक कार्य हाती घेतले आहे, ते अतिशय योग्य असून प्रभावी आहे. सनातनचा आश्रम अप्रतिम आहे. समस्त भारतवासीय आणि विदेशी यांनी जर या आश्रमाला भेट दिली, तर त्यांचीही ईश्‍वराप्रती श्रद्धा दृढ होईल आणि तेही साधना करायला लागतील.