जैन संप्रदायाचे पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
चौक (जिल्हा रायगड) येथून पायी चालत सकाळी ८ वाजता पू. महाराजांचे आश्रमात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेचे साधक उपस्थित होते. आश्रमदर्शनाच्या वेळी पू. विनम्रसागरजी महाराज आणि त्यांचे सर्व शिष्य यांनी जिज्ञासेने आश्रम पाहून त्यानुसार काही प्रश्नसुद्धा विचारले. आश्रम भेटीनंतर आश्रमातील पूर्णवेळ साधना करणार्या काही साधकांसमवेत त्यांनी आस्थेने संवाद साधला.