पुणे येथे साधना सत्संग शिबिर उत्साही वातावरणात पार पडले !
सनातन संस्थेचे श्री. सम्राट देशपांडे यांनी या शिबिराचा उद्देश सांगितला. त्यानंतर काही जिज्ञासूंनी साधना सत्संगात सहभागी झाल्यानंतर त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्यांच्या जीवनात झालेले आमूलाग्र पालट यांविषयी अनुभवकथन केले.