हिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई लढावी ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘अक्षय्य तृतीया’ हा हिंदु सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते; मात्र या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने अक्षय्य तृतीयेच्या नावाखाली जणू ‘रमझान’चेच विज्ञापन करत

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये विविध मंदिरे, भजनी मंडळे यांठिकाणी सामूहिक प्रार्थना करून देवाला साकडे घालण्यात येत आहे, तर काही ठिकाणी मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच काळानुसार साधना आहे ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

सर्वत्र भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अनैतिकता, बलात्कार या घटना वाढत आहेत. धर्मग्लानीच्या काळात धर्मसंस्थापनेची साधना करणे, ही काळानुसार साधना असते. त्यामुळे सध्या भारतात धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही साधना असणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित सर्वस्वाचा त्याग करून सेवारत आहेत.

वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्रीरामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात सनातननिर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले.

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला ! – सौ. शोभा पाटील, नगरसेविका, भाजप

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मंदिरांमध्ये सत्त्विकता आणि सकारात्मकता असतेच; मात्र तेथील स्वच्छता झाल्यामुळे त्या ठिकाणची प्रसन्नता अधिक वाढते.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे श्रीरामनवमीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

मी मृत्यूला घाबरत नाही. माझे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’, असे प्रतिपादन येथील गोशामहल विधानसभा क्षेत्राचे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी काढले.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी महाराष्ट्रात धर्मप्रेमी हिंदूंचे रामरायाच्या चरणी साकडे !

अनेक ठिकाणी शोभायात्रांमध्ये सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. मंदिरांमध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला. शेकडो ठिकाणी फलकलिखाण करून प्रवचने, तसेच ग्रंथप्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात आले होते.

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) सनातनच्या ११९ व्या समष्टी संतपदी विराजमान !

श्रीरामनवमीच्या मंगलमयदिनी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या मूळ वर्धा येथील; मात्र सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या सनातनच्या ११९ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.