गोव्यातील २५ मंदिरांमध्ये सामूहिक गार्हाणे
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारतभरात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना आणि विश्वकल्याण यांसाठी गोव्यातील विविध मंदिरांमध्ये श्रींच्या चरणी सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.