जोशपूर्ण घोषणांनी हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून दुमदुमली सांगली नगरी !
श्री गणेशाच्या पावन नगरी सांगलीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २५ मे या दिवशी हिंदू एकता दिंडीमध्ये सहभागी १ सहस्र २०० हिंदूंनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् यासारख्या अनेक जोशपूर्ण घोषणा देऊन हिंदु राष्ट्राचा हुंकार दिला.