वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद

परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी साधकांनी आचार्य श्री संजीव कपिल यांना संस्थेच्या कार्याची माहिती सांगून आशीर्वाद घेतले.

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

राजकोट (गुजरात) येथील ‘पुनरुत्थान विद्यापिठा’चे माजी संयोजक पराग बाबरिया यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले. भारतीय शिक्षण पद्धतीनुसार येथे साधकांना घडवले जात आहे. हिंदु संस्कृतीविषयी चांगल्या प्रकारे समजावले जाते, हे पाहून चांगले वाटले’, असे श्री. बाबरिया म्हणाले.

सनातन संस्थेच्या वतीने तेलंगाणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

केवळ श्री गुरूंमध्येच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यासारखे दिव्य कार्य करण्याची क्षमता असते. श्री गुरूच आपल्याला सर्वाेच्च ज्ञान प्रदान करू शकतात. हिंदु म्हणून आज आपण गुरुस्थानाचे रक्षण करून त्यांचा सन्मान राखला पाहिजे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

परात्पर गुरु डॉ. आठवलेगुरुजी यांनी धर्मासाठी केलेले हे कार्य अजरामर आहे आणि ते कार्य अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे. आश्रम पाहिल्यावर मला सकारात्मकता जाणवली. आश्रमातील सर्व साधकांचे चेहरे प्रफुल्लित दिसत होते.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

हिंदु समाजावर होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी केली नाही, तर हिंदूंचे पतन निश्चित आहे. त्यामुळे हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या मागे उभे राहून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘भगवा रक्षा वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. आशिष तिवारी यांनी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

मध्यप्रदेशमध्ये इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

उज्जैन येथील गुरुपौर्णिमेमध्ये सनातन संस्थेच्या सौ. स्मिता कुलकर्णी, इंदूर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, तर ग्वाल्हेर येथे समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’, या विषयावर मार्गदर्शन केले.

पुणे जिल्ह्यामध्ये मनमंदिरात भक्तीरूपी ज्योत प्रज्वलित करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘सनातन संस्थे’च्या वतीने १३ जुलै या दिवशी पुणे येथील चिंचवड, कोथरूड, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, जुन्नर, शिरवळ, तळेगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

चेन्नई येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातनच्या ग्रंथांतील मार्गदर्शन प्रत्येकाने आचरणात आणले, तरच आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हरिहरबुक्का निर्माण होऊ शकतात, असे मार्गदर्शन श्री. बालगौथमन्जी यांनी केले.

नगर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

सध्याचा काळ वाईट आहे, याची पावले ओळखून सर्वांनी अध्यात्माची कास धरून सतत साधना करणे आवश्यक आहे, तरच या आपत्काळात भगवंत आपले रक्षण करेल, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक, नगर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.