जळगाव येथे प्रारंभ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत सनातन संस्था सहभागी !
मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे.