सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महाकुंभ येथील दैवी अन् ऐतिहासिक प्रयागराज दौरा !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (सद्गुरुद्वयी)  यांनी २१ आणि २२ जानेवारी २०२५ या दिवशी तीर्थराज प्रयागराजचा दौरा केला. त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. हा दौरा दैवी आणि ऐतिहासिक ठरला. त्याविषयी जाणून घेऊया.

महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेच्या ‘फिरत्या वितरण कक्षां’द्वारे भाविकांमध्ये धर्मप्रचार !

महाकुंभमेळ्यात हिंदु धर्माचा प्रसार करत असलेले सनातन संस्चेथे ‘मोबाईल स्टॉल’ म्हणजेच सनातनचे ‘फिरते ग्रंथ आणि उत्पादन वितरण कक्ष’ हे हिंदु धर्माच्या प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरत आहेत.

सनातन संस्था आयोजित बालक-पालक मेळावा पार पडला !

येथील शाहूपुरी, खिंडवाडी आणि क्षेत्र माऊली या ठिकाणी सनातन संस्थेने बालक-पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला बालक आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्याचा लाभ ७७ बालक आणि २० पालक यांनी घेतला.

नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !

‘क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.’च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेने सनातन-निर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते. २४ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सीवूड्स, पाम बीच रस्ता,…

महाकुंभ मेळा २०२५ येथील हिंदु राष्ट्र पदयात्रेत सनातन संस्था सहभागी !

या पदयात्रेत हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ तथा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या विशेष रथात विराजमान होत्या.

महाकुंभक्षेत्री आग लागलेल्या घटनास्थळी सनातन संस्थेच्या साधकांचे प्रशासनास साहाय्य !

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सनातन संस्थेच्या साधकांनी तात्काळ आग लागलेल्या ठिकाणी जाऊन तेथील अग्नीशमन दल, पोलीस, एन्.डी.आर्.एफ् आणि प्रशासकीय कर्मचारी यांना साहाय्य केले.

महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथील सेक्टर ९, गंगेश्वर कैलाशपुरी चौक, कैलाशद्वार येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन संस्कृती आणि ग्रंथ प्रदर्शना’ला भेट दिली.

सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला प्रसिद्ध आचारी विष्‍णु मनोहर यांची सदिच्‍छा भेट !

चंपाषष्‍ठीच्‍या निमित्ताने नागपूरच्‍या कॉटन मार्केट येथील खंडोबा मंदिरात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक वस्‍तूंचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने येथील चाईबासा भागात साधनाविषयक प्रवचनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी सनातनच्‍या साधिका सौ. पूजा चौहान यांनी उपस्‍थित जिज्ञासूंना सांगितले, ‘‘पूजा, आरती, भजन इत्‍यादी उपासनेच्‍या प्रकारांतून देवतत्त्वाचा लाभ मिळतो…

कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तक महोत्‍सव २०२४’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथप्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

येथे ‘नॅशनल बुक ट्रस्‍टच्‍या वतीने ‘अहमदाबाद आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तक महोत्‍सव २०२४’चे आयोजन करण्‍यात आले. या महोत्‍सवात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथप्रदर्शनाचा कक्ष लावण्‍यात आला.