जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘सनातन धर्म शिकवण्‍यासाठी संस्‍थेद्वारे अत्‍याधुनिक पद्धतींचा उपयोग केला जात आहे’, हे पाहून पुष्‍कळ चांगले वाटले. माहितीजालाच्‍या (इंटरनेटच्‍या) काळात सनातन धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करता येऊ शकतो.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग !’

सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी, म्हणजेच १७ मार्च या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या श्री दक्षिणामूर्ति या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

शीख परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

शीख पंथीय गुरु गोविंदसिंग यांच्या परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांनी १६ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनुयायी श्री. कुलदीप सिंग आणि त्यांची पत्नी सौ. किरण सिंग आदीही होते.

संत श्री गजानन महाराज, अक्‍कलकोट यांच्‍या पावन पादुकांचे सनातन आश्रम, रामनाथी येथे शुभागमन !

सनातनच्‍या आश्रमात अक्‍कलकोट येथील श्री स्‍वामी समर्थ यांच्‍या परंपरेतील थोर संत श्री गजानन महाराज यांच्‍या पावन पादुकांचे शुभागमन झाले. म्‍हापसा, गोवा येथे होत असलेल्‍या सोमयागामध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी श्री गजानन महाराज यांचे उत्तराधिकारी डॉ. राजीमवाले यांचे आणि श्रीपादुकांचे गोमंतकात आगमन झाले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’ – अधिवक्‍ता चारुदत्त कळवणकर, भाजप नगरसेवक तथा नंदुरबार नगर परिषद विरोधी गटनेते, जयवंत चौक, नंदुरबार.

प्रेरणादायी वक्ते श्री. विवेक मेहेत्रे यांची देवद येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

प्रेरणादायी वक्ते, व्यंगचित्रकार आणि प्रकाशक श्री. विवेक मेहेत्रे यांनी नुकतीच सहकुटुंब देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट दिली. आश्रम पाहून त्यांनी अभिप्राय व्यक्त करतांना सांगितले की, आश्रमातील चैतन्यमय वातावरण, कमालीची स्वच्छता, सात्त्विकता आणि साधकांची आत्मियता या गोष्टी सर्वांना कोठेही आत्मसात कराव्यात अशाच आहेत.

पेण येथील चामुंडा ज्वेलर्स आणि भारतीय ॲल्युमिनियम यांच्या मालकांची सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

पेण येथील ‘चामुंडा ज्वेलर्स’चे मालक श्री. वरदी सिंह परमार आणि ‘भारतीय ॲल्युमिनियम’चे मालक श्री. अमर सिंह परमार यांनी नुकतीच देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. ते दोघेही हिंदुत्वनिष्ठ असून राष्ट्र-धर्म कार्यात वेळोवेळी सहभागी होतात.

सनातनच्या साधकांसारखी प्रसन्नता तात्काळ आत्मसात् करायला हवी ! – सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर

देवाच्या घरी आल्यावर देव जसा सन्मान करेल, तसा इथे झाला. सगळीकडे साधक असतात; परंतु सनातनच्या आश्रमात देवासारखी माणसे गुरुदेवांनी निर्माण केली आहेत. व्यष्टी साधनाही नीट न करणा-यांसाठी समष्टी साधना करणा-यांनी अतिथी म्हणून सर्व काही करावे, ही पुष्कळ विशेष गोष्ट आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट

मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, तसेच स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर आणि संशोधक श्री. धनंजय शिंदे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.