रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !
हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात २ एप्रिल २०२२ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात २ एप्रिल २०२२ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
‘बोरोसिल लिमिटेड’च्या श्रीमती किरण खेरूका यांनी सनातनच्या पनवेल येथील देवद आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत त्यांच्या नातेवाईक श्रीमती उषा शर्मा, तसेच सनातनच्या साधिका श्रीमती ललिता गोडबोले यासुद्धा उपस्थित होत्या.
व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.
गुरुपौर्णिमेच्या कालावधीत नेहमीच्या तुलनेत गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्याचा आध्यात्मिक लाभ जिज्ञासूंना अधिकाधिक व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या १ मासापासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह गुजरात येथे ‘ऑनलाईन’ ८९ प्रवचने घेण्यात आली. यांतून १ सहस्र ४८६ जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला समजलेली साधना आणि मिळालेले ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे, हीच गुरुतत्त्वाप्रतीची खरी कृतज्ञता आहे. त्यासाठी सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त समष्टी साधनेत खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया, असे चैतन्यमय मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले.
सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, अशा एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन केले.
गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, गुजराती, कन्नड अन् मल्ल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री व्यासपूजन, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या विधीच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहूया.
अक्षय्य तृतीया हे अविनाशी तत्त्वाचे प्रतीक आहे. या शुभदिनी (१४.५.२०२१ या दिवशी) सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली.