दुःखाचे मूळ दूर न करता वरवरचे हास्यास्पद उपाय करणारी सर्वपक्षीय सरकारे !

१. दारू, सिगारेट, विडी, तंबाखू इत्यादी व्यसन लावणार्‍या पदार्थांचे उत्पादनच होणार नाही, असे न करता त्यांचे अनिष्ट परिणाम सरकार सांगते. २. नद्यांचे पाणी प्रदूषित होणार नाही, असे न करता जलशुद्धीकरणाचा देखावा सरकार करते. ३. मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड करणार्‍यांवर शासन कोणतीही कारवाई करत नाही आणि झाडे लावा, झाडे जगवा सारख्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या उपक्रमांतून पर्यावरण … Read more

विदेशात वस्तूंची निर्यात करायची असली, तर इतर देशांतील अनुभवी निर्यातदार…

विदेशात वस्तूंची निर्यात करायची असली, तर इतर देशांतील अनुभवी निर्यातदार विविध देशांचा दौरा करतात. याउलट भारताचे मंत्री विदेशांत भटकायचे संधी साधतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मामुळे मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध एक होतात, तर हिंदु धर्माचा…

धर्मामुळे मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध एक होतात, तर हिंदु धर्माचा अभ्यास न केलेले जात्यंध आणि बुद्धीप्रामाण्यवादी हिंदूंमध्ये जातींवरून आपसात फूट पाडतात. त्यामुळे हिंदूंना जगात काय, तर भारतातही किंमत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कठीण समय येता कोण कामास येतो ?

मानव आणि ईश्‍वर यांच्यातील विविध कार्यांसंदर्भातील भिन्नता आणि ईश्‍वराचे श्रेष्ठत्व कार्याचे स्वरूप मानव ईश्‍वर १. वैद्यकीय रोगापासून सुटका भवरोगापासून (जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून) सुटका २. लेखा (अकाऊंट) कशाचा ? पैशांचा पाप-पुण्याचा ३. बांधकाम इमारती इत्यादी साधनेचे ४. न्याय मिळेल याची खात्री नसणे १०० टक्के खात्री ५. फलप्राप्ती दुःखनिवारण आणि सुख आनंद – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व

स्वभावदोष निर्मूलन हे नामजपापेक्षा आणि सेवेपेक्षा महत्त्वाचे आहे; कारण ते झाले, तरच व्यष्टी साधनेतील नामजप आणि समष्टी साधनेतील सेवा योग्य तर्‍हेने होऊ शकते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निराशा आणि वैराग्य

निराशा आणि वैराग्य या दोन्हींमध्ये कशात गोडी वाटत नाही; मात्र निराशेत मनाला वाईट वाटते, तर वैराग्यात जिवाला आनंद वाटतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांचे बोलणे परिणामकारक असणे, तर कीर्तनकार आणि प्रवचनकार बोलणे परिणामकारक नसणे

याचे कारण हे की, तन-मन-धनाच्या त्यागामुळे संतांच्या वाणीत चैतन्य असते, तर कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा कसलाही त्याग नसल्यामुळे, उलट धनाची अपेक्षा ठेवून कीर्तन आणि प्रवचन केल्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य नसते. यामुळे त्यांचे बोलणे परिणामकारक नसते. – (प.पू.) (परात्पर गुरु) डॉ. आठवले गीतेवर प्रवचन करणार्‍यांनो, तिचे महत्त्व सांगणार्‍यांनो, अर्जुनाच्या एक शतांश असा एक तरी धर्मयोद्धा आयुष्यात … Read more

सांप्रदायिक साधनेमुळे अहंभाव निर्माण होऊ शकण्याचे कारण

एखादा ध्यानमार्गाने साधना करणारा असल्यास त्याला काही तास ध्यान लावू शकणार्‍याची साधना चांगली आहे, असे वाटते. एखाद्याचा भाव जागृत होत असला, तरी त्याला तो कनिष्ठच वाटतो. असे होऊ नये म्हणून कोणाचा आध्यात्मिक स्तर किती आहे, हे कळण्यासाठी विविध योगमार्गांचा थोडातरी अभ्यास असणे आणि सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. – डॉ. आठवले

देवाकडे काही मागणे किंवा न मागणे

१. देवाकडे काही मागणे : आपली पात्रता असल्याशिवाय देव काही देत नाही. असे असतांना देवाला प्रार्थना कशाला करायची ?, असे काही जणांना वाटते. याचे उत्तर असे की, प्रार्थनेमुळे नम्रता निर्माण होण्यास साहाय्य होते. प्रार्थनेच्या जोडीला इतर साधना केल्यास पात्रता निर्माण होते. मग देव पाहिजे ते देतो. २. देवाकडे काही न मागणे : पात्रता असलेले देवाकडे … Read more

हिंदु धर्माप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रगती जलद होण्याचे एक कारण

प्रत्येकाचा धनप्राप्तीचा मार्ग निरनिराळा असतो, तसा ईश्‍वरप्राप्तीचा मार्गही निरनिराळा असतो. हे वैशिष्ट्य फक्त हिंदु धर्मातच आहे; म्हणून हिंदु धर्माप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रगती जलद होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले