भक्तांच्या आध्यात्मिक प्रगतीला नाही, तर आश्रम आणि मंदिरे यांच्या संख्येला महत्त्व देणारे संत !

बरेच संत आमचे बर्‍याच ठिकाणी आश्रम आणि मंदिरे आहेत, असे अभिमानाने सांगतात. त्यांना विचारले, भक्तांपैकी किती जण साधक आहेत आणि किती जण संत झाले ?, तर त्यांच्याकडे उत्तर नसते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेला घरच्यांनी विरोध करण्याचे कारण

समानशीलव्यसनेषु सख्यम् ।, म्हणजे ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात, त्यांच्यात मैत्री होते. यामुळे दारू पिणार्‍याला दारू पिणाराच आवडतो. त्याप्रमाणे साधना न करणार्‍यांना साधना न करणारेच आवडतात. साधना करणारे आवडत नाहीत; म्हणून ते साधना करणार्‍यांवर टीका करतात, त्यांना विरोध करतात. याउलट साधना करणार्‍यांची एकमेकांशी जवळीक होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंची आध्यात्मिक स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे एक कारण म्हणजे वाणीत चैतन्य नसलेले कीर्तनकार, प्रवचनकार आणि तथाकथित संत

भारतात हजारो कीर्तनकार, प्रवचनकार आणि अनेक संत असूनही हिंदूंची आध्यात्मिक स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. याचे कारण हे की, त्यांतील बहुतेक स्वतः साधना करत नाहीत. ते केवळ दुसर्‍यांना साधना करण्यास सांगतात. साधना न केल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाणीत चैतन्य नसते. त्यामुळे श्रोत्यांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे…

दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे बीज रूजत नाही; म्हणून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला गुरुकृपायोगात प्राधान्य दिले आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जागतिक लोकसंख्येचा परिणाम !

‘एखाद्या थाळीमध्ये जंतूंची वाढ प्रमाणाबाहेर झाल्यावर जंतूंना थाळीतील अन्न पुरत नाही. त्यामुळे ते मरतात. अशीच आता पृथ्वीची स्थिती झाली आहे. पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ७५० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात … Read more

कोणत्याही योगमार्गाने साधना करत असल्यास स्वभावदोष आणि अहं यांचे प्राधान्याने निर्मूलन करणे आवश्यक !

कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, हठयोग, कुंडलिनीयोग इत्यादी कोणत्याही योगमार्गाने प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंभाव न्यून असणे आवश्यक असते. सत्य, त्रेता आणि द्वापर युगांत मानवांत स्वभावदोष आणि अहंभाव न्यून असायचा. आता कलियुगात स्वभावदोष आणि अहंभाव अधिक प्रमाणात असल्यामुळे बहुतेकांची साधनेत प्रगती होत नाही. यासाठी साधक कोणत्याही योगमार्गाने साधना करणारा असला, तरी त्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं निर्मूलन … Read more

चुकांकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन !

चुका झाल्यानंतर अनेक जण त्याच विचारांत रहातात आणि सेवा करतांना चुका होतील, असा विचार करून तणावाखाली सेवा करतात. चुकांचा सतत विचार करायला नको. आतापर्यंतच्या शेकडो जन्मांत आपण अनेक चुका केल्या आहेत; पण तोे भूतकाळ झाला. त्यामुळे चुकांचा विचार करण्यापेक्षा चुका न होण्यासाठी काय करायला हवे ? याचा विचार करून सतत तसे प्रयत्न करायचे. – (परात्पर … Read more

भावस्थिती निर्माण करण्याचे महत्त्व

आरंभीच्या स्थितीला श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी त्याच्याशी खेळणे, बोलणे इत्यादी ठीक आहे; पण पुढच्या टप्प्यात नामजप करणे अधिक योग्य ! याचे कारण श्रीकृष्णाशी बोलतांना पुष्कळ शब्दांचा वापर केला जातो, तर नामजपात केवळ चार-पाच शब्दच येतात. अनेकातून एकात जाणे, हे आपले ध्येय आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे भावाच्या स्थितीत रहाणे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

घराला आश्रम बनवण्याचे महत्त्व

घराचा आश्रम केल्यास घरातील सर्वांनाच त्याचा लाभ होतो. अशा घरातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने घराच्या आसपास असलेली अन्य घरे आणि तेथे रहाणारे लोक यांनाही त्या चैतन्याचा लाभ होतो, तसेच परिसराची शुद्धी होऊ लागते. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पृथ्वीचीच शुद्धी करायची आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची स्थापना काळमहिम्यानुसार होणारच असली, तरी त्या कार्यात सहभागी होणे, म्हणजे स्वतःची साधना होय !

१०.५.२०१५ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी माझ्या संदर्भात सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन केले. तेव्हा त्यांनी पुढे हिंदु राष्ट्र होणार आहे, असे सांगितले. यासंदर्भात काही जणांच्या मनात प्रश्‍न आला, हिंदु राष्ट्र होणारच आहे, तर आपण प्रयत्न कशाला करायचे ?, याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे, श्रीकृष्णाने जेव्हा केवळ उजव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गोप-गोपींनी पर्वताला … Read more