राष्ट्रप्रेमी हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपण श्रीरामाच्या वानरसेनेतील वानरांप्रमाणे सहभागी आहोत, हा भाव ठेवा !

असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर आपलाही उद्धार होईल, नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी अहंभाव जागृत असल्यावर आपला उद्धार होणार नाही. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कुठल्याही पुरस्कारापेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे महत्त्वाचे !

पद्मभूषण, राष्ट्रपती पदक, नोबेल प्राइस यांपेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे अधिक महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक…

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या संघटनांचा प्रसार त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा भारत येथेच होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांच्या तुलनेत राजकारण्यांचे महत्त्व शून्य

राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात आणि पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

योगासनातून ॐ आणि सूर्यनमस्कार काढणार्‍या आणि चुकीची शिकवण देणार्‍या धर्मद्रोह्यांनो, हे लक्षात घ्या !

योगासनातून ॐ आणि सूर्यनमस्कार काढणारे ऋषीमुनींपेक्षा स्वतःला शहाणे समजतात का ? योगासने केवळ शारीरिक व्यायाम नसून आध्यात्मिक व्यायाम आहेत. मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या धर्मद्रोह्यांचे कार्य आणि नाव काही वर्षांतच कोणाच्या लक्षात रहात नाही. याउलट ऋषींनी सांगितलेले अनंत काळापर्यंत अस्तित्वात रहाते; कारण त्यांच्यामध्ये ॐ ची निर्गुणाची शक्ती आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांनाच विचारूनच कार्य करा !

आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परिक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्य करण्याच्या वेळी राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून तशी कृती केली पाहिजे. असे केले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोणता जप करावा ?

१. व्यष्टी साधना : व्यष्टी साधनेला प्रारंभ करतांना कुलदेवतेचा (म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असल्यास कुलदेवीचा आणि त्यांपैकी एक असल्यास त्याचा किंवा तिचा), ती ज्ञात नसल्यास श्री कुलदेवतायै नमः ।, असा नामजप करावा. त्याच्याच जोडीला बहुतेक सर्वांनाच पूर्वजांचा त्रास असल्यामुळे श्री गुरुदेव दत्त । हा जपही करावा. गुरुमंत्र मिळाला असल्यास या दोन जपांऐवजी गुरुमंत्राचा जप … Read more

९० टक्क्यांच्या पुढे अद्वैत निर्माण होत असल्याने वासनेचे विचार नष्ट होणे

जोपर्यंत मी आणि अन्य कोणीतरी असे द्वैत आहे, तोपर्यंत वासनेचे विचार येतात. कोणाशीतरी एकरूप व्हायचे आहे, असे वाटत असते; पण ९० टक्क्यांच्या पुढे द्वैत अल्प होऊ लागतेे. मी आणि अन्य कोणी हा भेद रहात नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत, असे वाटत असल्याने वासना रहात नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, कार्यक्षेत्र निरनिराळे असले, तरी सर्व कृतीशील हिंदूंना आपले समजा !

हिंदूंच्या विविध बैठकांत आणि अधिवेशनांत निरनिराळ्या धर्माभिमान्यांशी बोलतांना लक्षात येते की, प्रत्येकाला गोरक्षण, श्रीराम मंदिर, धर्मशिक्षण, हिंदू संघटन, स्वसंरक्षण प्रशिक्षण इत्यादींपैकी एखादा विषय त्यांच्या प्रकृतीनुसार महत्त्वाचा वाटतो. त्याला त्यासंदर्भातच कार्य करणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे काही जणांना त्याच्यात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासंदर्भात प्राधान्य नाही, असे वाटते. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रत्येक विषयच महत्त्वाचा … Read more

व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि धर्मासंबंधीच्या सर्व प्रश्‍नांकडे मानसिक आणि बौद्धिक…

व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि धर्मासंबंधीच्या सर्व प्रश्‍नांकडे मानसिक आणि बौद्धिक नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीने पहायला शिका, तरच कार्यकारणभाव आणि उपाय लक्षात येतील आणि यश मिळेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही. तसे आध्यात्मिक बळाशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य ! यासाठी साधना करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले