संतांचे श्रेष्ठत्व !

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परिपूर्ण हिंदु धर्म !

‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अद्वितीय हिंदु धर्म !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांना नीती आणि धर्म शिकवा !

‘पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मोक्षप्राप्ती व्हावी’, असे वाटणे आणि ‘धर्मकार्य करण्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटणे

‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिकवण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

‘ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे … Read more

उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम प्रत्येक गोष्टीला लागू पडतो; म्हणून कोणत्याच गोष्टीत अडकू नये

उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम प्रत्येक गोष्टीला लागू पडतो; म्हणून कोणत्याच गोष्टीत अडकू नये. कोणतीच गोष्ट ‘माझी, माझी’ म्हणू नये. ‘ती एक दिवस नष्ट होणार’, हे ओळखून असावे. मनाला अशा पद्धतीने समजावले, तर मन कोणत्याच गोष्टीत अडकत नाही. मनाला विषयापासून दूर नेल्यावर आपोआपच मनुष्याची त्या त्या गोष्टीतील आसक्ती संपते आणि जीवनात ईश्वरप्राप्तीच्या दिशेने प्रगती … Read more

सनातन संस्था आणि हिंदु राष्ट्र यांचा परस्परसंबंध !

सनातन संस्था म्हणजे केवळ एक संस्था नसून तेथे हिंदु राष्ट्राचे (ईश्वरी राज्याचे) प्रत्यक्ष वातावरण आहे. हे वातावरणच पुढे पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची निर्मिती करणार आहे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्याचे महत्त्व !

गुरुमुखातून आलेले शब्द नादरूपाने आकाशमंडलात रहातात. गुरूंचे हे चैतन्यमय शब्द प्रत्यक्षात उतरवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अध्यात्मात गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे, तरच आपली प्रगती होते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते

देवाप्रती भाव असेल, तर तो प्रत्येक परिस्थितीत आपल्याला स्थिर ठेवतो. भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते आणि आपल्याला साधनेत पुढे नेते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ