राजकारण आणि अध्यात्म यांतील भेद

१. राजकारणातील क्षणभंगुरता अ. ‘एखादी व्यक्ती सत्तेवर असतांना तिला शासनाच्या वतीने सुख-सुविधा पुरवल्या जातात. त्या व्यक्तीला पोलिसांकडून संरक्षण दिले जाते. आ. त्या व्यक्तीचा पदाचा कालावधी पूर्ण झाला की, तिला दिलेल्या सुविधा काढून घेतल्या जातात. त्या व्यक्तीवर अकस्मात् पद (सत्ता) सोडण्याची वेळ आली, तर एका रात्रीत तिच्याकडे असलेले दायित्व काढून घेतले जाते आणि दुसर्‍या व्यक्तीला दायित्व … Read more

साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी मनाच्या स्तरावर साधनेचे प्रयत्न करा !

‘साधना’, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न ! अनेकजण साधना म्हणून त्या संदर्भातील अनेक ग्रंथांचा अभ्यास करतात. यामध्ये केवळ बुद्धीचा वापर होतो. साधनेच्या प्राथमिक टप्प्याला साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. त्यामुळे या टप्प्यावर साधनेसाठी बुद्धीचे महत्त्व ७० टक्के आणि मनाचे महत्त्व ३० टक्के असते. साधनेचे महत्त्व कळल्यावर मात्र साधनेसाठी मनाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवणे आवश्यक असते, … Read more

भक्तीयोगाचे मह‌त्त्व !

‘ज्ञानयोगानुसार साधना केल्यास ती प्रामुख्याने बुद्धीने होते. कर्मयोगानुसार साधना केल्यास ती शरीर आणि बुद्धी यांनी होते, तर भक्तीयोगानुसार साधना केल्याने ती मन, बुद्धी आणि शरीर यांद्वारे होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात. हे प्रयत्न केल्‍यामुळे आपली साधनेची तळमळ आणखी वाढते. असे चक्र चालू रहाते. यावरून आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व लक्षात … Read more

तक्रार नको, तर अंतर्मुख होऊन कारण शोधा !

‘अनेक जण ‘त्‍याची प्रगती होते; पण माझी प्रगती होत नाही’, अशी तक्रार करतात. खरे तर येथे ‘माझ्‍यामध्‍ये काय कमी आहे की, ज्‍यामुळे माझी प्रगती होत नाही ?’, याचा विचार करणे आवश्‍यक असते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२३)

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना स्‍थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ईश्वरी कायदे आणि जमाखर्च यांचे महत्त्व !

‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यज्ञाला विरोध करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्‍या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना अभ्यासाच्या अभावी कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिकण्याच्या वृत्तीचा लाभ !

‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले