एखादी कृती करता न येणे, यामागची प्रमुख दोन कारणे

१. एकतर मुळातच त्या कृतीविषयी काही माहिती नसणे. २. ती न करण्यामागे अहं, आळशीपणा किंवा ती कृती करण्यास न आवडणे, यांसारखे स्वभावदोष आड येणे. उपाय – कृती करता न येण्यामागचे मूळ कारण शोधून त्यानुसार प्रयत्न करणे आणि ती कृती करतांना देवाला प्रार्थना करणे : साधकांनी ‘यांपैकी नक्की कोणते कारण आहे ?’, याचे चिंतन करावे आणि … Read more

आपले बोलणे कसे असावे ?

आपले बोलणे असे असावे की, जे दुसर्‍याला साधनेत प्रोत्साहन देऊन गुरुसेवेत पुढे नेईल ! प्रत्येकाचा आनंद शोधून त्याच्याच भाषेत साधनेला धरून त्याच्याशी बोलायला हवे. यालाच ‘प्रकृतीशी जुळवून घेणे’, असे म्हणतात. त्यामुळे समोरच्याशी पटकन जवळीक साधता येते आणि संबंधित कार्याची फलनिष्पत्तीही वाढते. ‘दुसर्‍याला काय सांगायचे आहे ?’, हे मनाशी ठरवून त्याला चूक जरी सांगायची असली, तरी … Read more

सर्व पृथ्वीलाच घर बनवा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला सर्व पृथ्वीलाच घर बनवण्याचे ध्येय दिले आहे. आता सर्व विश्‍व हाच आमचा संसार आहे. गुरूंच्या कृपेने आता आम्हाला वेगळे घर आणि नातेवाईक राहिले नाहीत. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

खरे गुरुस्मरण

‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे. आपण गुरूंच्या कार्याचा विचार केला, तरच देवही आपला विचार करतो. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होईल

‘भगवंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सेवा उपलब्ध करून देतो. माझ्याकडून सेवा करवूनही घेतो; परंतु सेवा झाल्यावर कर्तेपणाच्या विचारांमुळे ‘ती सेवा मी केली’, असे साधकाला वाटते. कर्तेपणा नष्ट करण्यासाठी प्रत्येक सेवेची संधी दिल्याविषयी, सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’ – … Read more

हिंदु राष्ट्रात माध्यमांचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधनेसाठी होईल !

‘हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

आत्मचिंतनाची शेवटची सिद्धी म्हणजे मोक्ष !

‘मीपणा’ची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून, स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव होत होत ‘मीपणा’ची जाणीव शेष राहिली, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. अशा स्थितीने दु:खाची जाणीव न होता, देह भावाचा अभाव होऊन, कुठलीही चिंता न रहाता, केवळ एका आनंदाचाच अनुभव शेष रहाणे म्हणजेच ‘जीवनमुक्ती’ होय, यालाच ‘कैवल्य’ किंवा ‘मोक्ष’ असेही म्हणतात. ही आत्मचिंतनाची … Read more

ईश्वर हा ‘काळ’ असल्याने त्याच्याशी एकरूप झालेल्या संतांचे वागणे काळानुसार असते !

​‘एखाद्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने नुकतीच साधना करण्यास आरंभ केला, तर त्याला लगेच त्याच्या व्यसनाविषयी सांगणे योग्य नाही. ‘संतांना केव्हा काय करायचे ?’, हे ज्ञात असते; कारण त्यांना काळ कळतो. त्यामुळे वेळ आली की, ते त्या व्यक्तीला तसे सांगतात. तो त्यांच्याकडून झालेला एक उपदेशच असतो. वेळ आली की, आपोआपच त्या व्यक्तीचे दारूचे व्यसन सुटते. … Read more

अपेक्षा करणे

‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. अपेक्षापूर्ती झाल्यावर तात्कालिक सुख मिळते; परंतु त्यामुळे अहंचे पोषण होते आणि अपेक्षेप्रमाणे झाले नाही की, दुःख होते. म्हणजे दोन्ही प्रसंगांत साधनेच्या दृष्टीने हानीच आहे.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

‘श्रीराम स्वतः ईश्‍वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्‍वरी राज्याची स्थापना ईश्‍वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो. ‘आता हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्‍वराने करावी किंवा संतांकडून करवून घ्यावी’, यासाठी आपण त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे.’ ‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्‍वरप्राप्ती, … Read more