आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मर्यादा !

‘आधुनिक वैद्यकशास्त्र (ॲलोपॅथी) हे आजाराचे केवळ शारीरिक, म्हणजेच वरवरचे निदान करते. त्याचे मूळ कारण शोधू शकत नाही. आजाराचे मूळ आध्यात्मिक कारण असते, उदा. त्या रुग्णाचे प्रारब्ध, त्याला असणारा वाईट शक्तींचा त्रास इत्यादी. आधुनिक वैद्यकशास्त्र हे शोधून त्यांवर उपाययोजना काढू शकत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण !

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सर्वधर्मसमभाव म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात

‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्‍याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो !

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘संत’ ही जगातील सर्वोच्च पदवी !

‘भारतरत्न, नोबेल इत्यादी मानवाने दिलेल्या पारितोषिकांचे ‘संत’ या ईश्वराने दिलेल्या पदवीपुढे काय मूल्य आहे ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ऋषीमुनींचे महत्त्व !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यवहार आणि साधना यांमधील भेद

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांना ‘आमचा मुलगा दैवी बालक आहे’, यामुळे कृतज्ञता वाटते !

‘हल्लीच्या पालकांना ‘आमचा मुलगा इंग्लीश बोलतो’, याचा अभिमान असतो, तर साधकांना ‘आमचा मुलगा दैवी बालक आहे’, यामुळे कृतज्ञता वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले