ईश्वरी नियोजनानुसार योग्य वेळी मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते

‘वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही, तर ईश्‍वरी नियोजनानुसार अगदी वेळेवर (योग्य वेळेतच) मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

किती जन्म घेऊ देवा !

‘किती जन्म घेऊ अभ्यास करण्या, ज्ञान तुझे अनंत । ज्ञानाऐवजी तूच मला हवास, देवा अनंता ।।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)

संतांप्रती भाव असण्याचे महत्त्व !

‘आपण संतांच्या केवळ चरणांना स्पर्श करून भावपूर्ण नमस्कार करतो. तेव्हा त्यांच्या चरणांमधून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याने आपल्याला लाभ होतो. याउलट मर्दन करणारे संतांचे संपूर्ण अंग रगडतात; पण त्यांच्यात संतांप्रती भाव नसल्याने त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१०.२०२१)

पोलिसांनो, निर्दाेष व्यक्तीला त्रास दिल्याचे पाप लागू नये, म्हणून प्रतिदिन अधिकाधिक साधना करा !

‘पोलिसांचा प्रतिदिन गुन्ह्यांशी संबंधित अनेक संशयितांशी संपर्क येतो. या संशयितांकडून गुन्ह्याच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी प्रसंगी कठोर होऊन त्यांना मानसिक आणि शारीरिक दंडही द्यावा लागतो. हा त्यांच्या कार्यशैलीचा एक भाग असतो. चौकशीअंती एखादी संशयित व्यक्ती निर्दाेष असल्याचेही लक्षात येते; पण कर्मफलन्यायानुसार पोलिसांना त्या निर्दाेष व्यक्तीला दिलेल्या दंडाचे पाप लागते अन् त्या व्यक्तीबरोबर केलेल्या गैरवर्तणुकीमुळे … Read more

व्यवहार आणि अध्यात्म

‘व्यवहारामध्ये ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये’, असे सांगितले जाते; परंतु अध्यात्मात साधनेसाठीच्या प्रयत्नांचा जितक्या प्रमाणात अतिरेक करू, त्याचा अधिकाधिक लाभच होत जातो आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१२.२०२१)

संतांचे चैतन्य !

‘संतांच्या चैतन्यामुळे त्यांच्या संपर्कातील निर्जीव वस्तूतही सकारात्मक पालट होतो, तर त्यांच्या शिष्यांमध्ये होणार नाही का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१२.२०२१)

ध्यानाचे लाभ आणि तोटे

ध्यानामुळे व्यष्टी साधना होते; पण समष्टी साधना होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)

‘साधनेविना ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे अशक्य आहे’, हेही न कळणा-या हिंदुत्वनिष्ठ संघटना !

‘बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्य हे शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील आहे. त्यांच्या कार्याला साधनेने मिळणार्‍या आध्यात्मिक बळाचा काहीच आधार नाही. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भात बोलतात; पण त्यांच्या लक्षात येत नाही की, हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधनेविना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही आणि ईश्वराच्या आशीर्वादाविना काहीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना ‘हिंदु … Read more