परिपूर्ण सेवेचे महत्त्व !

‘सेवा केल्यास त्याचा ३० टक्के लाभ होतो. सेवा चांगली केली, तर ५० टक्के आणि परिपूर्ण केली, तर १०० टक्के लाभ होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.४.२०२२)

संत देवाचे सगुण रूप असल्याने ते सुंदर दिसतात !

संत देवाचे सगुण रूप असल्याने सुंदर दिसतात. त्यामुळे संत बाह्यतः कसेही दिसले, तरी ‘त्यांच्याकडे बघत रहावे’, असे वाटते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.४.२०२१)

ईश्वराचा सर्वाेच्च गुण प्रीती असल्याने ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात !

ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात. ईश्वराचा सर्वाेच्च गुण म्हणजे प्रीती ! पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती काळी असली, तरी ती सुंदर दिसते. विठ्ठलामध्ये सर्वांप्रती असलेल्या प्रीतीची एक प्रकारची आकर्षणशक्ती आहे. देवतांच्या मूर्ती बाह्यतः निर्जीव दिसल्या, तरी त्यांच्यात असलेल्या चैतन्यामुळे त्या सजीव आणि सुंदर दिसतात. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.४.२०२१)

अमृत आणि विष

अमृतको जहरका डर होता है । भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा ‘जहर’ म्हणजे विष घेतले, तर ‘आपण मरू कि काय’, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही. (संदर्भ : प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनचा ग्रंथ … Read more

सेवेची पूर्ण फलनिष्पत्ती कशी मिळेल ?

प्रत्येक सेवा ‘साक्षात् भगवंताची पूजा करत आहे’, या भावाने केल्यास ईश्वराला अपेक्षित अशी सेवेची पूर्ण फलनिष्पत्ती मिळेल ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

सत्संगाला वेळेत उपस्थित रहाण्याचे महत्त्व !

साधकांनो, सत्संगाच्या वेळी देवता, ऋषिमुनी आणि पुण्यात्मे यांचेही आगमन होत असल्याने सत्संगाला वेळेत उपस्थित रहा ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

साधना म्हणजेच आनंद !

‘साधना म्हणजेच आनंद ! साधनेतील आनंद अनुभवण्यासाठी त्या मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर चिकाटीने मात करतो, तो खरा साधक !’ – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाणे हे सातत्याने आचरणात आणायला हवे !

‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’ – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !

‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ