सेवा करण्याचे महत्त्व !

साधकांचे तन, मन आणि बुद्धी अर्पण व्हावी, यासाठी सेवा आहे. साधकांतील अहं न्यून होण्यासाठी गुरुसेवा करणे आवश्यक आहे. ‘आपली तळमळ वाढावी, आपले मन आणि बुद्धी शुद्ध व्हावी, तसेच अहंचे निर्मूलन व्हावे’, यासाठी गुरुदेवांनी सर्व सेवा निर्माण केल्या आहेत. – पू. (सौ.) संगीता जाधव

मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील असल्याने केवळ तोच साधना करू शकतो !

‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (५.४.२०२२)

सर्वव्यापक ब्रह्मांडाच्या नक्षत्रलोकातून येणारे सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे ज्ञान !

‘या ब्रह्मांडात अनेक नक्षत्रे आहेत. एका नक्षत्राचा एक कण म्हणजे मनुष्य वास करतो, ती भूमी होय ! एवढ्या मोठ्या नक्षत्राचा एक कण म्हणजे ही भूमी आहे, तर एक नक्षत्र किती मोठे असेल ? अशी अनंतकोटी नक्षत्रे असलेले ब्रह्मांड किती मोठे असेल ! सप्तर्षी जीवनाडीपट्टीतील ज्ञान अशा त्या सर्वव्यापक ब्रह्मांडाच्या नक्षत्रलोकातून आलेले आहे !’ – सप्तर्षी … Read more

मनुष्याने अधर्माचरणाची परिसीमा गाठल्यावर श्रीविष्णूचे सुदर्शनचक्र आपोआप सुटून नरसंहाराला आरंभ होईल !

१. शिशुपालाचे १०० अपराध भरल्यावर श्रीकृष्णाने त्याचा वध करणे १ अ. शिशुपालाच्या जन्माच्या वेळी झालेली आकाशवाणी जेव्हा शिशुपालाचा जन्म झाला, तेव्हा त्या बाळाला रूप नव्हते. ते बाळ म्हणजे काळ्या मांसाचा एक विकृत आकार होता. त्याला ३ डोळे आणि ४ हात होते. तेव्हा आकाशवाणी झाली, ‘एका दिव्य पुरुषाची दृष्टी या बाळावर पडली की, त्याला मूळ रूप … Read more

आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये !

बांबू उसासारखा दिसतो; मात्र आपण जसा ऊस खातो, तसा बांबू खाऊ शकत नाही. बांबू म्हणजे ‘नास्तिक’ आणि ऊस म्हणजे ‘आस्तिक’. देवावर श्रद्धा असणारे म्हणजे ‘मध’ आणि देवावर श्रद्धा नसणारे म्हणजे ‘साखर’. मध खाल्ल्याने रोग होत नाहीत. साखर अधिक खाल्ल्याने रोग होतात. या उदाहरणांतून असे लक्षात येते की, आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये ! – … Read more

अध्यात्म स्वतः अनुभवल्याविना त्यातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही !

ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध घेतल्याविना त्याचा सुगंध कळत नाही, त्याचप्रमाणे साधना करून अध्यात्माचा अनुभव घेतल्याविना मनुष्याने त्याविषयी बोलू नये. ज्याप्रमाणे फुलातील सुगंधाचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे अध्यात्मातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९२ (२९.१०.२०२१))

मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करत असल्याने तो अधर्मी बनतो !

जगातील नैसर्गिक गोड पदार्थ म्हणजे ‘मध.’ त्यामध्ये गोडपणा ईश्वरानेच निर्माण केला आहे. युगानुयुगे मधमाश्या मध गोळा करतात. त्या मधमाश्यांना कुणी पगार देत नाही. ईश्वराने जे कार्य त्यांना नेमून दिले आहे, त्या तेवढेच करतात; मात्र मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करतो; म्हणून तो अधर्मी बनतो. – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी … Read more

ईश्वराचे श्रेष्ठत्व जाणा !

मानवाने आतापर्यंत अनेक गोष्टींचा शोध लावला आहे; मात्र मानवाच्या लक्षात येत नाही की, त्याने शोध लावलेली प्रत्येक गोष्ट नीट चालण्यासाठी ईश्वरी आशीर्वादाची आवश्यकता आहे. मानवाने आकाशयान (विमान) निर्माण केले; मात्र ‘आकाश ईश्वराने निर्माण केले आहे’, हे तो विसरतो. मानव म्हणतो, ‘मी विमान निर्माण केले.’ देव म्हणतो, ‘अरे मानवा, मी तुला निर्माण केले आहे !’ – … Read more

अंतरातील भावाचे महत्त्व

‘मंदिरांत ईश्वराची, देवतेच्या मूर्तीची पूजा होत असते. मूर्तीकडे पहाणाऱ्या व्यक्तीतील भावानुसार त्या त्या देवतेचे आशीर्वाद तिला मिळतात. शिल्पकाराने एखाद्या दगडाकडे पाहिल्यावर त्याला त्या दगडात देवाची मूर्ती दिसू लागते. ‘अमुक दगडापासून कोणत्या देवतेची मूर्ती सिद्ध होईल’, हे त्या शिल्पकाराच्या लगेच लक्षात येते. आपली दृष्टी एखाद्या दगडाकडे गेल्यास आपल्याला केवळ दगड दिसतो; मात्र शिल्पकारातील भावामुळे त्याला दगडात … Read more

केवळ ईश्वरालाच १०० टक्के ज्ञान असते !

आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींमागचा कार्यकारणभाव आपल्या लक्षात येईलच, असे नाही. सहदेव श्रीकृष्णाला म्हणतो, ‘‘मला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असूनही शेवटपर्यंत ‘कर्ण माझा भाऊ आहे’, हे समजले नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो, ‘‘अरे सहदेवा, कुणालाही कितीही ज्ञान असले, तरी त्याला एखाद्या गोष्टीविषयी केवळ ९९ टक्केच कळू शकते. १०० टक्के केवळ मलाच (ईश्वरालाच) ठाऊक आहे.’’ – सप्तर्षी (पू. डॉ. … Read more