निरर्थक साम्यवाद

‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देवाप्रती भाव ठेवण्याचे महत्त्व

अ. आपण देवाचा एक हात धरला की, देव आपले दोन्ही हात धरतो. आ. श्रद्धेतून भाव आणि भावातून भक्ती असेल, तरच आपल्याला मुक्ती मिळू शकेल. इ. अध्यात्मात बुद्धी खुंटीला टांगून ठेवूया आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करूया. – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

सेवा करतांना लक्षात ठेवावयाची सूत्रे

अ. धर्माच्या कार्यात खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया ! आ. सनातनचा एक जरी ग्रंथ प्रत्येक हिंदूच्या घरी गेला, तरी ते घर साधनारत होईल. इ. आपण ‘काही घेण्यासाठी नाही, तर पुष्कळ काही देण्यासाठी जात आहोत’, असा भाव ठेवून जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेला जाऊया. ई. साधकाने पाठपुरावा केल्यानंतर झालेली सेवा देवाजवळ पोचत नाही. उ. एखाद्या सेवेचे … Read more

साधकत्व

अ. साधकांनो, स्वतःतील स्वभावदोषांचा त्याग करता आला पाहिजे. आ. लहान व्हायला शिका ! (साधनेत न्यूनता घ्यायला शिका !) इ. मनासारखे झाले, तर हरिकृपा आणि मनाच्या विरुद्ध झाले, तरीही हरीची इच्छा ! – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

सत्संगाचे महत्त्व

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो. – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

हिंदु राष्ट्राच्या फलश्रुतीच्या संदर्भातील दृष्टीकोन !

‘जेव्हा हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपण सर्व जण मागील बाकड्यांवर (बॅकबेंचर) बसलेले असू आणि हिंदु राष्ट्राचे विजय ढोलक वाजवणारे दुसरे कुणीतरी असतील ! आपल्याला केवळ समाधान असेल की, आपण काळानुसार कार्य केले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भौतिक विकासापेक्षा आत्मिक विकास श्रेष्ठ !

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

एकरूपतेची प्रक्रिया !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र, म्हणजेच ईश्वरी राज्य !

हिंदु राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापि ‘हिंदु राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्वरी राज्य’ म्हणता येईल.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र … Read more