ईश्वराचे राज्य कल्पनातीत आहे !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मकार्यार्थ ईश्वराचा आशीर्वाद कसा प्राप्त कराल ?

‘ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आपण धडपड केली, तर ईश्‍वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्‍वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वराशी एकरूप होण्यासाठी व्यष्टी नाही, तर समष्टी साधनाच आवश्यक !

‘ईश्वर सर्व प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा, यासाठी कार्यरत असतो. हे त्याचे व्यष्टी नाही, तर समष्टी कार्य आहे. अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही समष्टी साधनाच (समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्नरत रहाणे) करणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.६.२०२२)

देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो. देवाला ओळखण्यासाठी, तसेच त्याच्या अस्तित्वाची देह, मन आणि बुद्धी यांना जाणीव होण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. साधनेत शीघ्र आध्यात्मिक प्रगती … Read more

हिंदु राष्ट्रात भ्रष्टाचार, बलात्कार इत्यादी का नसेल ?

‘हिंदु राष्ट्रातील शाळांत भूगोल, गणित, रसायनशास्त्र इत्यादी आयुष्यात काही उपयोग नसलेल्या विषयांपेक्षा ‘मुले सात्त्विक कशी होतील’ याचे, म्हणजे ‘साधना कशी करायची’ याचे शिक्षण दिले जाईल. त्यामुळे रामराज्यात नव्हते, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी हिंदु राष्ट्रात नसेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मनाचे कार्य !

आपले मन हेच अनुसंधानाचे माध्यम आहे. मनच आपल्याला मायेमध्ये अडकवून ठेवते आणि मनच ईश्वरप्राप्तीच्या दिशेने घेऊन जाते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

साधना कुणाची होते ?

जे साधक ध्येय निश्चित करून स्वतःकडून झालेल्या चुका स्वीकारतात, स्वतःच्या चुका लक्षात आल्यावर इतरांचे साहाय्य घेतात आणि इतरांच्या चुका लक्षात आल्यावर त्यांनाही साहाय्य करतात, त्या साधकांची साधना होत असते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आदर्श साधक कुणाला म्हणावे ?

जे साधक ईश्वरप्राप्तीच्या ध्येयासाठी मायेचा त्याग करायला सिद्ध आहेत, स्थुलातून शरीर अर्पण करत आहेत, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून मन समर्पित करण्याचा प्रयत्न करत आहेत, दुर्बुद्धीचा त्याग करून स्वतःचे तन, मन, बुद्धी अन् अहं अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ‘आदर्श साधक’ आहेत. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

वैज्ञानिक संशोधनाची मर्यादा !

‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्‍वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले