साधना मनोभावे सांगण्याचे महत्त्व

नवीन लोकांना भेटून ‘त्यांना साधना सांगणे, आपले कार्य सांगणे’, हे आपले साधनेतील कर्म आहे. त्या लोकांनी साधना करणे, न करणे हे त्यांचे कर्म आहे; पण आपण साधना सांगण्याचे आपले कर्म मनोभावे पूर्ण केल्याने त्यांच्या चित्तावर आपण सांगितलेल्या साधनेच्या गोष्टींचा संस्कार होतो. आपले कार्य त्यांच्या चित्तावर कोरले जाते. पुढे कुठल्यातरी जन्मात त्या लोकांना आपल्या कार्याचे, साधनेचे … Read more

भारताची शोकांतिका !

‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि विज्ञाननिष्ठांना अतिशय मर्यादित ज्ञान असण्याची कारणे

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more

भारतियांनी साधना न केल्याचा परिणाम !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी जनता नीतीशून्य झालेल्या भारतात भ्रष्टाचार, बलात्कार, दंगली यांपेक्षा निराळे काय होणार ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लवकरच होणार हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी सद्य:स्थिती !

‘गायींची हत्या झाली, तर गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांना त्याचे काही वाटत नाही आणि गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला, तर गोरक्षकांना त्याचे काही वाटत नाही ! प्रत्येकाला ‘हिंदूंचे सर्व प्रश्‍न माझेच आहेत’, असे वाटेल, तेव्हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने हिंदूंची वाटचाल होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पाण्यात आणि मनात साम्य काय ?

पाणी आणि मन हे दोन्ही जर गढूळ असतील, तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात. दोन्ही जर उथळ असतील, तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात. दोन्ही स्वच्छ असतील, तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात; पण पाण्यात आणि मनात मुख्य भेद तो काय ? पाण्याला बांध घातला, तर पाणी ‘संथ’ अन् मनाला बांध घातला, तर माणूस ‘संत’ होतो. – अज्ञात

हिंदू धर्मांतर करण्यामागील कारण !

‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्‍वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी.असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्‍या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्‍वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले