जमीनको आधार नहीं, आसमानको कबर नहीं, इन्सानको सबूर नहीं ।

भावार्थ : ‘इन्सानको सबूर नहीं’ म्हणजे व्यावहारिक अर्थाने फुरसत नाही, वेळ नाही आणि आध्यात्मिक अर्थाने आयुष्य इतके लवकर निघून जाते की, साधना करायला वेळच मिळत नाही. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

नाम श्‍वासाला जोडण्यातील फायदे

हल्ली (अयोग्य विचारांमुळे) वायूमंडल बिघडलेले असल्यामुळे श्‍वासाबरोबर बिघडलेले (दूषित) विचारही मनात येतात आणि मनोविकार होतात. तसेच इतर विचारही मनात येतात. श्‍वासाबरोबर नामजप करतांना इतर विचारांचे प्रमाण अल्प होते आणि त्यामुळे विशिष्ट प्रकारचा अनुभव आल्याचे जिवास भासते. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

अंतर्मनात अखंड नामजप चालू असल्याची लक्षणे

‘अंतर्मनात अखंड नामजप चालू आहे कि नाही, हे समजण्याच्या खुणा म्हणजे झोपेतून जाग आल्यावर नामजप चालू असल्यास ते अनुभवणे, संभाषण संपल्यावर नामजप चालू होणे, आपले काम चालू असतांना मधे मधे नामजपाची आठवण होणे इत्यादी.’ – डॉ. आठवले (२१.६.२००७)

अध्यात्माचा अभ्यास करण्यात शब्दांना असलेली मर्यादा

‘अध्यात्मात जास्तीतजास्त ५० टक्के एवढेच ज्ञान शब्दांत मिळू शकते. त्यापुढचे सर्व ज्ञान अनुभूतींनीच मिळते. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. १. जिथे साखरेची गोडी शब्दांत सांगता येत नाही, ती अनुभवावीच लागते, तिथे चांगल्या आणि वाईट शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती इत्यादी आध्यात्मिक परिभाषेतील शब्दांचा अर्थ शब्दांत कसा सांगता येईल ? २. लांबी, रुंदी, उंचीआणि काळ … Read more

अध्यात्मात ‘बुद्धीप्रमाण’ हा शब्दच नसणे

‘मनाने मनन केले जाते. चित्ताने चिंतन केले जाते, तर बुद्धीने निर्णय घेतले जातात. अध्यात्मात शास्त्रप्रमाण हा शब्द आहे; पण प्रत्येकाची बुद्धी निराळी असल्याने ‘बुद्धीप्रमाण’ हा शब्दच नाही !’ अर्थ : बुद्धी निर्णय घ्यायचे कार्य करते. ‘बुद्धी’ हा शब्द ‘अहं’शी संबंधित असतो आणि ‘अहं’ हा आध्यात्मिक उन्नतीला घातक असल्याने त्याला अध्यात्मात शून्य टक्के महत्त्व आहे.’ – … Read more

पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे अध्यात्म आहे म्हणजे काय ?

‘एखाद्याचे अक्षर सुंदर आहे, हे डोळ्यांना दिसते, ते मनाला आवडते. आवडण्याचे कारण ‘अक्षर सुंदर आहे’, हे बुद्धीला कळते. याउलट पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे गेलेल्यांना सूक्ष्मातील स्पंदने कळतात. त्यामुळे त्यांना संतांचे अक्षर चांगले नसले, त्यांनी वेड्यावाकड्या रेखाट्या ओढल्या, तरी त्यांत चैतन्य असल्याचे जाणवते; म्हणून ‘ते चांगले आहे’, असे ते म्हणतात.’ – डॉ. आठवले (२४.६.२००७)

हिंदूंनो, हिंदुराष्ट्र स्थापनेच्या ऐतिहासिक अध्यायातील अमरज्योत बना आणि गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपा !

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! भौतिकतेकडे झुकलेल्या समाजाला साधनेकडे वळवणे आणि खर्‍या शिष्यांना मोक्षाला नेणे, हे गुरूंचे खरे कार्य आहे. खरे शिष्य याच मार्गाचे अनुसरण करून आयुष्यभर समष्टी कार्य करतात. शिष्याने गुरु करत असलेल्या समष्टी कार्यासाठी तन-मन-धनाने समर्पित होणे, ही गुरूंप्रतीची खरी कृतज्ञता होय ! गुरु-शिष्य परंपरेने दिलेले समष्टी योगदान मोठे आहे. … Read more