कोणता जयघोष कधी करावा ?
१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)
१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)
सत्ययुगात कायदेच नव्हते, म्हणजे त्यांची आवश्यकताच नव्हती; कारण प्रत्येक जण नीतीवान होता. त्रेतायुगात थोडेफार कायदे होते; पण त्यांची आवश्यकता फारच अल्प होती. द्वापरयुगापासून कलियुगापर्यंत कायद्यांची संख्या वाढत गेली आहे. प्रत्यक्षात कितीही कायदे केले आणि कायद्यांनुसार कितीही कडक शिक्षा केल्या, तरी त्यांचा गुन्हेगारांवर काहीही परिणाम होत नाही, हे पुनःपुन्हा तेच गुन्हे करणार्यांवरून सिद्ध झाले आहे. धर्मशिक्षणाच्या … Read more
शहरात रहाणारे लोक मायेच्या आधीन जीवन जगत असतात. बहुतेकजण या मायेच्या चक्रामध्ये देवाला विसरलेले असतात. अनेक सुखसुविधांमुळे त्यांच्या शरिराला कष्ट करायची सवय रहात नाही. तसेच प्रलोभने आणि स्वार्थ यांमुळे त्यांची वृत्ती संकुचित आणि प्रेमभाव नसलेली बनते. त्यामुळे त्यांच्या मनातील निर्मळता आणि आनंद लोप पावलेला असतो आणि त्यांचे मन तणावानेच ग्रस्त असते. तसेच शरिराला कष्टाची सवय … Read more
हिंदु धर्माचा अभ्यास आणि साधना नसल्याने हिंदूंना धर्माचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे कोणी हिंदु राष्ट्राची स्थापना करा. हिंदु धर्माचा जगभर प्रसार करा, असे म्हणत नाही. आजार्याला औषधाचे महत्त्व कळते. औषधांहून हिंदु धर्म अनंत पटींनी श्रेष्ठ आहे. औषधे केवळ काही वेळा आजार बरा करतात; पण मृत्यूपासून सुटका करू शकत नाहीत. याउलट धर्म भवरोगातून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या आजारातून … Read more
बुद्धीप्रामाण्यवादी आयुष्यभर बुद्धीने मायेतील स्थूल गोष्टींचा शोध घेत रहातात, तरी त्यांना त्यासंदर्भात अतिशय अत्यल्प आणि तेही फक्त वर्तमान स्थितीतील कळते. त्यांना स्थूल गोष्टींतील चिरंतन तत्त्व कळत नाही. याचे कारण हे की, साधना नसल्यामुळे त्यांना विश्वबुद्धीचे साहाय्य होत नाही. त्यामुळे त्यांचे विचार आणि संशोधनही ५० – ६० वर्षांनी कोणाला ज्ञात नसते. याउलट अनादी वेद विश्वबुद्धीतून ग्रहण … Read more
श्रीकृष्ण माझ्या रूपात अनुभूती देतो. साधकांना वाटते, प.पू. डॉक्टरांमुळे अनुभूती आल्या. यातून शिकण्यासारखे हे की, श्रीकृष्णाने अनुभूती दिल्या, तरी तो कर्तेपण मला देतो. साधकांनीही हे लक्षात ठेवून प्रत्येक कृतीचे कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण केले पाहिजे. – डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२२.५.२०१३))
१. अहं न्यून करण्यासाठी प्रार्थना आवश्यक असते. प्रार्थना करतांना काहीतरी स्वेच्छा असते. अगदी विश्वासाठी प्रार्थना केली, तरी तिच्यात स्वेच्छा असते. २. पुढे ईश्वरेच्छेवर सगळे सोडल्यावर प्रार्थनेऐवजी मनाला निर्विचार स्थिती आणि शांती अनुभवता येते. – डॉ. आठवले (आषाढ कृष्ण पक्ष ११, कलियुग वर्ष ५११५ (२.८.२०१३))
पहाणे हे तेजतत्त्वाच्या स्तरावरील असते, तर ऐकणे हे आकाशतत्त्वाच्या स्तरावरील असते. त्यामुळे पहाण्यापेक्षा ऐकण्यात अधिक आनंद असतो. एखादी कलाकृती किंवा व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी तिच्याकडे अधिक काळ पहाता येत नाही. त्याचे आणखीन एक कारण म्हणजे तेथे विषय एकच रहातो. याउलट आकाशतत्त्वाच्या स्तरावर विविध विषयांवर बोलता येते; म्हणूनच चित्रे किंवा मूक चित्रपट यांच्यापेक्षा आकाशवाणी अधिक … Read more
हिंदू नेहमी ऋग्वेदातील कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।, म्हणजे संपूर्ण विश्वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू असे अभिमानाने म्हणतात. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याचा आरंभ स्वतःपासूनच केला पाहिजे. कृण्वन्तो स्वम् आर्यम् ।, म्हणजे स्वतःला सुसंस्कृत करू, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥ अशी त्यांची स्थिती होणार नाही … Read more
पूर्वीच्या काळी राजवाड्यात आरसे महाल असत. महालात व्यक्ती कुठेही असली, तरी ती दिसते. त्यामुळे ती सर्वत्र आहे, असे दिसायचे. भक्तांना आरसे महाल तयार करावा लागत नाही; कारण त्यांना देव केवळ सर्वत्रच नाही, तर स्वतःमध्येही दिसतो. – डॉ. आठवले (२८.१०.२०१३)