बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, अध्यात्मात बुद्धीला महत्त्व नाही, तर बुद्धीलयाला महत्त्व आहे, हे प्राथमिक तत्त्व समजून घ्या !

बुद्धीप्रामाण्यवादी बालवाडी किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश देतांना वय पहातात. अध्यात्मात वयानुसार नाही, तर पात्रतेनुसार शिक्षण मिळते, उदा कु. वैभवी भोवर (वय १६ वर्षे), सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ५१ वर्षे) आणि डॉ. अजय जोशी (वय ५८ वर्षे) हे आज एकाच दिवशी ६१ टक्के पातळीचे झाले. एवढेच नव्हे, तर शाळेत कधीही न गेलेला अन् शारीरिकदृष्ट्या अपंग … Read more

शांतीच्या लहरी संदर्भात स्पष्टीकरण

सनातनच्या ग्रंथांतील सूक्ष्म-परिक्षणात काही ठिकाणी शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो. शांती निर्गुणाशी संबंधित असतांना शांतीच्या लहरी कशा असतील ?, असे काही जणांना वाटते. ते योग्यही आहे. प्रत्यक्षात निर्गुणाच्या स्थितीला गेल्यावर, म्हणजे अद्वैतात गेल्यावर शांतीची अनुभूती आली, असे सांगणाराही उरत नाही. शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो, तो ३० टक्क्यांहून अधिक शांती अनुभवणार्‍या साधकांना आलेला अनुभव असतो. … Read more

ईश्‍वर सर्वव्यापी असतांना फक्त स्वतःचा विचार करत गेल्याने मानवाची होत गेलेली परमावधीची अधोगती !

१. पूर्वी सर्व गाववाले एक असत. २. पुढे फक्त एकत्र कुटुंबातील सर्वजण एक असत. ३. आता एका कुटुंबातील पती-पत्नीही घटस्फोट घेतात आणि मुलेही आई-वडिलांना विचारत नाहीत ! या स्थितीत राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वांनी एकत्र येणे किती कठीण आहे, हे लक्षात येईल. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे साधना करून सर्वांबद्दल प्रीती निर्माण करणे. – … Read more

मंदिरांच्या सरकारीकरणानंतर सरकार पुढे उचलणार असलेली संभाव्य पाऊले आणि त्यांचा परिणाम !

१. संभाव्य पाऊले १ अ. पंढरपूरला विठ्ठलाच्या मूर्तीच्या पूजेचे चित्रीकरण करून त्यावरून नवीन पुजार्‍यांना पूजा कशी करायची, हे सरकार शिकवणार आहे. असे करणे हे शस्त्रक्रिया कशी करायची, याची चित्रफीत दाखवून शल्यविशारद तयार करणे यासारखे हास्यास्पद आहे. पूजेत केवळ शारीरिक क्रिया नसून ती भावाच्या स्तरावरची कृती आहे. भक्तीने भक्तीभाव जागृत झाल्यावरच खरी पूजा होते. घरची किंवा … Read more

मंदिरांतील पुजार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

मंदिरांतील पुजार्‍यांनी आपण देवाचे भक्त आहोत आणि मंदिरात येणार्‍यांना भक्ती करायला शिकवणे, ही आपली साधना आहे, या दृष्टीने आपल्या पुजारीपणाकडे पाहिले पाहिजे. असे केले, तरच समाजाला पुजारी आपले वाटतील आणि त्यांचीही प्रगती होईल. – डॉ. आठवले (२३.१.२०१४)

…आणि माझा अहं अल्प झाला !

आतापर्यंत डॉ. आठवले यांनी सनातन संस्था स्थापन केली, अशी संस्थेची ओळख करून दिली जायची. आता सनातन संस्थेचे डॉ. आठवले, असे मला ओळखतात ! – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (३.६.२०१३))

सात्त्विक छंद जोपासण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने तन-मन-धनाचा त्याग करणे म्हणजे साधना !

काही जणांना क्रिकेटचा, काही जणांना गाण्याचा, काही जणांना नृत्याचा, काही जणांना फिरायला बाहेरगावी जाण्याचा, असे विविध छंद असतात. त्याचप्रमाणे काही जणांना तीर्थक्षेत्री जाण्याचा, काही जणांना भजन, कीर्तन किंवा प्रवचन यांना जाण्याचा, तर काही जणांना संतांकडे जाण्याचा छंद असतो. आधीच्या छंदांपेक्षा हे छंद बरे असले, तरी त्याच्यामुळे होणारी एक हानी, म्हणजे आपण साधना करतो, या भ्रमात … Read more

स्थुलातून पूजा, साष्टांग नमस्कार इत्यादी कृती करण्यापेक्षा त्या मनाने केल्यास अधिक लाभ होणे

याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. स्थुलातून कृती करत असतांना देहाकडेही लक्ष द्यावे लागते. त्याच कृती मनाने करतांना तसे लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे त्या कृती एकाग्रतेने आणि भावपूर्ण करणे सुलभ होते. २. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे. सूक्ष्मतम ईश्‍वराकडे जाण्यासाठी साधना सूक्ष्मातून करणे अधिक महत्त्वाचे आहे. – डॉ. आठवले (वैशाख अमावास्या, कलियुग वर्ष ५११५ (८.६.२०१३))

हल्लीच्या कुटुंबांची केविलवाणी स्थिती !

एकुलता एक मुलगा असला की, वडिलांची सर्व संपत्ती मिळते; पण भावंडांबरोबर कसे रहायचे ? भावंडांचे प्रेम म्हणजे काय ?, हे शिकायला मिळत नाही. पुढे आई-वडिलांचे सर्व उत्तरदायित्वही सांभाळावे लागते. ते नको असल्याने हल्लीची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. साधना केल्यास मुले कृतज्ञतापूर्वक आई-वडिलांचे शेवटपर्यंत सर्व करतात आणि त्यांच्या मुलांसमोरही एक आदर्श ठेवतात. – डॉ. आठवले … Read more

मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असणे

काही जणांना वनस्पती, पशू-पक्षी, इतकेच काय, तर निर्जीव वस्तूही काय बोलतात, हे कळते. ते आयुष्यभर त्यातच रममाण होतात. हा झाला सिद्धीचा एक प्रकार. मायेतील स्थुलातील कळणे जसे ईश्‍वरप्राप्तीच्या संदर्भात निरर्थक असते, तसेच मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असते. – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (२१.४.२०१३))