हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो !

‘खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

जिज्ञासू

जिज्ञासूपणा असणे, म्हणजे आपल्यामध्ये नवनवीन शिकण्याची वृत्ती असणे. प्रत्येक गोष्टीतील नाविन्यता साधना करण्यात आपला उत्साह वाढवते. उत्साहामुळे नवनवीन शिकण्याची वृत्ती जागृत राहिल्याने आपला आनंदही टिकून रहातो. याच आनंदात ईश्वराची प्रसन्नता असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

ईश्वरप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाचा गुरूंनी सांगितलेली सेवा झोकून देऊन करतांना कितीही संघर्ष झाला, तरीही त्याने तो सहन करणे आवश्यक !

‘जर एखाद्या साधकाने सर्वसंगपरित्याग करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे, तर त्याने गुरु सांगतील ती सेवा झोकून देऊन करावी, मग कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल. या संघर्षाचे फळ गोडच असते. गुरु शेवटी साधकाला चिरंतन अशा आनंदमय ईश्वराची प्राप्ती करून देतातच; परंतु मायेचे तसे नसते. मायेत होणारा संघर्ष शेवटी आपल्या पदरात दुःखच टाकतो. … Read more

वर्तमानकाळाचे सोने करा !

‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२८.१.२०२२)

खरे प्रदूषणनिवारण करायचे असेल, तर प्रथम मनातले प्रदूषण दूर करा !

‘प्रदूषणासंदर्भात सगळीकडे गाजावाजा करून जो उपाय केला जातो, तो रोगाच्या मुळावर उपाय न करता वरवरचे उपाय करण्यासारखे आहे. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाची औषधे न देता केवळ त्याला येणार्‍या खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद … Read more

आध्यात्मिक स्तराचे महत्त्व

१. ‘उच्च आध्यात्मिक स्तर असला की, रज-तम यांचा परिणाम होत नाही. याउलट उच्च आध्यात्मिक स्तरामुळे निर्माण झालेल्या चैतन्याचा रज-तम यांच्यावरच परिणाम होतो आणि रज-तम अल्प होतात. २. आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात. ३. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांच्या पुढे पोचली, म्हणजे जीव संतपदाला पोचला की, त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवच … Read more

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

‘नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक अन् शासन यांच्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत. ‘या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मातील आश्रमप्रणालीचा अर्थ !

‘हिंदु धर्मात ‘वर्णाश्रम’, म्हणजे वर्ण आणि आश्रम ही जीवनपद्धत सांगितली आहे. त्यातील वर्ण म्हणजे जात नव्हे, तर साधनेचा मार्ग. आश्रम चार आहेत – १. ब्रह्मचर्याश्रम, २. गृहस्थाश्रम, ३. वानप्रस्थाश्रम आणि ४. संन्यासाश्रम. त्यांचा अनुक्रमे अर्थ आहे – १. ब्रह्मचर्यपालन, २. गृहस्थजीवनाचे पालन, ३. गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुनीवृत्तीने वनात रहाणे आणि ४. संन्यासजीवनाचे पालन. या चारही … Read more

विविध विषयांतील तज्ञ आणि संत

‘व्यावहारिक जीवनात डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळ्यांचा आजार होतो. हृदयरोगतज्ञ डॉक्टरांना हृदयाचा विकार होतो. मनोविकारतज्ञांना मानसिक विकार झाल्याचेही आढळते; परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले