उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही !
उपाय म्हणून औषधे घेतल्यास त्यांचा कधी दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होऊ शकतो; पण उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही ! – डॉ. आठवले (१८.६.२०१४)
उपाय म्हणून औषधे घेतल्यास त्यांचा कधी दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होऊ शकतो; पण उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही ! – डॉ. आठवले (१८.६.२०१४)
देवाचे गुण आपल्यात यावे; म्हणून साधक साधना करतात. देवाच्या इतर गुणांकडे त्यांचे लक्ष असते; पण त्याच्या तारक रूपात त्याचा चेहरा हसरा, आनंदी असतो, हे बर्याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, मन आणि शरीर यांचे एकमेकांवर परिणाम होतात. मन गंभीर असेल, तर चेहरा गंभीर दिसतो. याउलट चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला, … Read more
कलाकाराने एखादी अप्रतीम कलाकृती कोणाला दाखवली, तर ती पहाणार्याला केवळ व्यक्तीगत सुख देते. ती पहाणार्याला काही शिकवू शकत नाही. याउलट एखाद्याला अध्यात्म विषयक काही सांगितले, तर त्याला आनंद मिळतो आणि ते ज्ञान इतरांना देऊन तो इतरांनाही आनंदी करू शकतो. याचा अर्थ हा की, कला व्यष्टी साधनेत साहाय्य करते, तर ज्ञान समष्टी साधनेसाठी उपयुक्त आहे. – … Read more
१. व्यक्तीवरील प्रेम : शारीरिक आकर्षण हा साध्या प्रेमाचा पाया असतो. प्रेयसीविषयीचे किंवा प्रियकराविषयीचे प्रेम हे लैंगिक इच्छा किंवा लैंगिक उपजत बुद्धीपासून निर्माण होते आणि ते प्रत्येक जिवंत प्राण्यात आणि माणसात असते. १ अ. देवावरील प्रेम : देवाविषयी प्रेम केवळ माणसात असते. जे निर्माण करावे आणि वाढवावे लागते. २. व्यक्तीवरील प्रेम : पुरुषाचे स्त्रीविषयी आणि … Read more
रोग औषधांनी बरे होऊ शकतात. वातावरण पालटण्याने मानसिक रोगांची तीव्रता अल्प होते. मंत्रांनी किंवा देवतांची पूजा केल्याने पिशाचांचे निवारण होऊ शकते; परंतु हे उपचार निश्चितपणे रोग किंवा दुःख निवारण करतीलच, अशी खात्री नसते. काही रोग असाध्य असतात. प्रारब्धामुळे होणारे रोग किंवा दुःखे उपाय करूनही नाहीसे करता येत नाहीत. सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तर सुखम् । – महाभारत, … Read more
विज्ञानाचा अभ्यास केलेले अध्यात्मविषयक तत्त्वांचे विश्लेषण करू शकत नाहीत; पण अध्यात्माचा अभ्यास केलेले विज्ञानातील तत्त्वांचे अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विश्लेषण करू शकतात ! – डॉ. आठवले (१४.६.२०१४)
त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे ! : संचलनाला साथ देणाऱ्या संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन करतांना सावधान साप्ताहिकाने म्हटले होते, ‘त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे. ती आशेची हाक आहे. तो पराक्रमाला हुंकार आहे. तो विजीगिषेचा … Read more
बकऱ्यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली. वाघीण गरोदर होती. उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली. तिचे पिल्लू त्या बकऱ्यांच्या कळपात वाढू लागले. बकऱ्यांसह तेही पालापाचोळा खाऊ लागले. बकऱ्या ‘बें बें करीत. तसेच तेही ‘बें बें’ करू लागले. हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले. एक दिवस त्या बकऱ्यांच्या कळपावर एका वाघाने … Read more
इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषद भरली. त्या परिषदेचे उद्घाटन न्या. रानड्यांनी केले. त्या वेळी विवेकानंदांनी त्याच परिषदेत गर्जना केली, “माझ्यासमोर हिंदु समाज सुधारणासंबंधीचे उद्घाटनाचे भाषण आहे”. समारोप करतांना विवेकानंद कडाडले, “रानडे आणि इतर समाजसुधारकहो जिंदे रहो ! या तुमच्या समाजसुधारणा आंग्लाळलेल्या भारताच्या आहेत. समाजसुधारकहो ! हे विसरू नका की, आपल्या हिंदु समाजाच्या समस्या तुम्ही अथवा … Read more
आमच्या शिक्षणपद्धतीत आमच्या धारणा हव्यात. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आमच्या पाप-पुण्य, परलोक, ऋषीसृष्टी, पितरसृष्टी, देवसृष्टी, स्वर्ग-नरक, दृष्ट-अदृष्ट अशा धारणा असायला हव्यात. सगळ्या विषयांत या धारणा हव्यात. अगदी गणित-व्याकरणापासूनच्या पुस्तकांतून असे दृष्टांत हवेत. हिंदुस्थानभर चालू असलेला मिताक्षरा कायदा असायला हवा. त्यानुसार विवाह, दायभाग, दत्तक वगैरे निर्णय व्हावेत. ग्रहणादीपर्वकाळाचे अनुसरण व्हावे. मुलींच्या शाळेत ‘अश्वत्थ’ असावा. अभ्यासाला प्रारंभ … Read more