ईश्वरप्राप्ती ही पूर्णकालीन साधना !
‘ईश्वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ईश्वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हल्ली पाश्चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते ! आपल्याकडे ही स्थिती होऊ नये; म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भ्रष्टाचार, बलात्कार, बुद्धीप्रामाण्यवाद, अनैतिकता, गुंडगिरी, देशद्रोह, धर्मद्रोह इत्यादींना आता जे उधाण आले आहे, त्याला कारणीभूत आहेत, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे जनतेला साधना, नैतिकता इत्यादी न शिकवणारी आतापर्यंतची सरकारे ! यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एका कपाटात किती सामान मावेल, याचा विचार सर्वसाधारण व्यक्ती करते; पण देशात किती कोटी मानव सुखाने राहू शकतील, त्यांना पुरेसे अन्न-पाणी मिळेल, याचा विचार न करणार्या आतापर्यंतच्या सरकारांमुळे देशाची लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी ३५ कोटी होती. ती आता १३५ कोटींहून अधिक झाली आहे. हे सर्व सुधारण्यासाठी आता हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more
‘पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी उद्या ‘विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, मंगळागौर आणि वटपौर्णिमा करू नये’ इत्यादी फतवे काढल्यास आश्चर्य वाटणार नाही ! याकरिता पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मानव प्रगत होतो, तसे त्याच्यात नम्रता, विचारून सर्व करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण होतात. पुरोगाम्यांत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती नसते, उलट ‘मला सर्व समजते. मला वाटते तेच योग्य !’, हा अहंकार असल्याने त्यांची वाटचाल आदिमानवाकडे होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पाश्चात्त्यांचे विज्ञान सांगते, ‘आदिमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे.’ प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे. सत्ययुगातील मानव देवाशी एकरूप होता. त्रेता आणि द्वापर युगांत त्याची थोडी अधोगती होत गेली. आता कलियुगाच्या आरंभीच त्याची परमावधीची अधोगती झाली आहे. कलियुगाच्या उरलेल्या अनुमाने ४ लक्ष २६ सहस्र वर्षांत त्याची किती अधोगती होईल, याची कल्पनाही … Read more
‘आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत. ‘प्रश्नाचा अभ्यास, तपासण्या करतो आणि नंतर सांगतो’, असे म्हणतात. याउलट संत एका क्षणात कोणत्याही प्रश्नाचा कार्यकारणभाव आणि उपाय सांगतात, जे आधुनिक तज्ञ कधीही सांगू शकत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात. हा नामजप त्या साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक/पूरक असतो, तसेच त्या जपामागे गुरूंचा संकल्पही कार्यरत असतो. गुरुमंत्राचे इतके अनन्यसाधारण महत्त्व असतांना बहुतेक शिष्य गुरुमंत्राकडे दुर्लक्ष करून गुरूंचेच नाव घेतांना दिसतात. यातून त्या शिष्यांची प्रगती होण्याची गती न्यून होतेच, तसेच ते गुरूंच्या सगुण रूपात … Read more