सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि इतर संस्थांतील कार्यकर्ते यांच्यातील भेद

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते ईश्‍वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी प्रयत्नरत असतात; म्हणून त्यांना इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणत्याही पदाची अपेक्षा नसते. – डॉ. आठवले

शाळेतच प्रत्येक गोष्ट साधना म्हणून करायला शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती !

कोणालाच त्याचे काम, व्यवसाय साधना म्हणून करायला न शिकवल्याने कामगारांपासून आधुनिक वैद्य (डॉक्टर), वकील इत्यादींपर्यंत सर्वच अधिक पैसे कसे मिळवता येतील ?, याचाच विचार करतात. साधना म्हणून प्रत्येक गोष्ट करायला शाळेतच शिकवले असते, तर देशाची दुर्दशा झाली नसती. – (प.पू.) डॉ. आठवले

भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी पाश्‍चात्त्यांचे प्रशस्तीपत्र नको !

पारतंत्र्यामुळे आमच्यात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळेच आता पाश्‍चात्त्यांनी प्रशस्तीपत्र दिल्याविना आम्हाला आमचे सिद्धांत शिरोधार्य वाटत नाहीत. सुदैवाने आता पाश्‍चात्त्य लोकच आमचे पातंजल योगशास्त्रासारखे शास्त्र अभ्यासू लागले आहेत. पाश्‍चात्त्य लोक कितीही भौतिकवादी असले, तरी जिज्ञासू आहेत. त्यांच्या स्तुती-निंदेची अपेक्षा न करता आम्ही आपल्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे आणि त्याचे आचरण केले पाहिजे. – सुप्रसिद्ध कायदेपंडित श्री. रजनीकांत … Read more

प्रगती

जसजशी प्रगती होते, तसतसे परमेश्‍वरापुढे आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. – (प.पू.) डॉ.आठवले (२९.७.२०१४) विज्ञान विज्ञानवाद्यांनो, विज्ञान तात्कालिक सुख देते, तर अध्यात्म चिरंतन आनंद देते, हे समजून घ्या ! – (प.पू.) डॉ. आठवले (२१.२.२०१४)

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारे राज्यकर्ते जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या !

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारे राज्यकर्ते जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या ! : स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे राज्यकर्ते जनहितकारी नसल्याने फटाके वाजवू नका, यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मोहिम राबवावी लागत आहे. एखादे सुबुद्ध सरकार असते, तर त्याने मुळाशी जाऊन फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी घातली असती. हिंदु राष्ट्रात हे साध्य होईल. – प.पू. डॉ. … Read more

कलियुगातील ऋषीमुनी !

प.पू. रामानंद महाराज प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. अण्णा कर्वे प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी एखादा राजा अत्याचार करायला लागला, तर ऋषीमुनी त्यांचे तपःसामर्थ्य वापरून त्याला धडा शिकवायचे. कलियुगाच्या सध्याच्या काळात प.पू. रामानंद महाराज, इंदूर यांनी ११.३.२०१४ या दिवशी देहत्याग करीपर्यंत अनेक अनुष्ठाने केली. प.पू. दादाजी वैशंपायन, प.पू. अण्णा कर्वे, प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी इत्यादी संत अहोरात्र साधना आणि … Read more

अजेय राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक घटक

क्षात्रतेज असलेले सैनिकी सामर्थ्य आणि प्रखर राष्ट्रभक्तीने भारलेला समाज या दोन्हींमुळेच अजेय राष्ट्र निर्माण होते ! – सरसंघचालक प.पू, गोळवलकर गुरुजी

‘हिंदुत्ववादी संघटनाच सर्व काही करतील’, अशी अपेक्षा न करता प्रत्येक हिंदूने क्रियाशील होणे आवश्यक !

एका डॉक्टरांनी तेथील एका निराश्रित हिंदु महिलेची करुण कहाणी सांगून तिच्यासाठी संघ काय करील ? असा प्रश्न केला. त्यावर डॉ. हेडगेवार उत्तरले, ‘सध्या संघ काहीही करू शकत नाही. मात्र तुम्ही ते काम अंगावर घेत असाल, तर मी व्यक्तीशः साहाय्य देण्यास तयार आहे’. मग काय करायचा तुमचा संघ ? अशा शब्दांत त्या प्रश्न् विचारणाऱ्या गृहस्थाने असमाधान … Read more

श्राद्ध नाही, तर वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग !

वृद्ध आई-वडिलांची, आजोबा-आजींची काळजी न घेता, ते गेल्यावर श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध करणार्‍यांना विधींचा कितपत लाभ होणार ? पूर्वजांचा त्रास होतो; म्हणून नारायण-नागबळी सारखे विधी करणे केवळ स्वार्थी होेत. वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग आहे. वडिलधार्‍यांची सेवा करणे हे कर्तव्यच आहे. त्याचे पालन केले, तर पुण्य लाभत नाही, पण न केल्यास दोष … Read more

आई-वडिलांविषयी कृतज्ञता वाटली पाहिजे !

कोणी थोडेफार साहाय्य केले,तरी त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते.आई-वडिलांनी तर जन्म दिला आणि आपल्याला लहानाचे मोठे केले;म्हणून त्यांच्याबद्दल किती कृतज्ञता वाटली पाहिजे !आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची शेवटपर्यंत काळजी घेणे,हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. – (प.पू.) डॉ.आठवले (२९.७.२०१४)