एका वर्षात १२ मास असतात. प्रत्येक मासात ४ आठवडे असतात. प्रत्येक आठवड्यात ७ वार असतात. प्रत्येक वारात २४ घंटे (तास) असतात. प्रत्येक घंट्यात ६० मिनिटे असतात आणि प्रत्येक मिनिटात ६० सेकंद असतात. त्यामुळे एखाद्या सेकंदाचा काळाच्या संदर्भात उल्लेख करायचा असेल, तर तो वर्ष २०१५ मधील जुलै मासांतर्गत तिसर्या आठवड्यातील गुरुवार, सकाळी १० वाजून १० मिनिटे आणि १० सेकंद अशा तर्हेने करावा लागेल.
तसेच युगांच्या संदर्भात आहे. काळाचे मोजमापन सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या ४ युगांच्या आधारे केले जाते. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या ४ युगांच्या चक्रातील प्रत्येक युगात काळाची ४ छोटी युगेही काळानुसार येतात. त्यातील काळाच्या छोट्या चक्रातही काळाची आणखीन छोटी चक्रे असतात. त्यानुसार एका छोट्या चक्रातील कलियुगानंतर दुसर्या चक्रातील कलियुग येते. अशी अनेक छोटी कलियुगे असतात. अशी एकाच्या अंतर्गत दुसरे अशी ५ कलियुगे आतापर्यंत झाली आहेत. त्यापुढील सहाव्या युगचक्रातील सत्ययुग २०२३ या वर्षी येणार आहे. २०२३ या वर्षी (१) कलियुगांतर्गत (२) कलियुगांतर्गत (३) कलियुगांतर्गत (४) कलियुगांतर्गत (५) कलियुगांतर्गत (६) कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, असे जे आपण सांगतो, त्याचा अर्थ बर्याच जणांना कळत नाही. तोे वरील उदाहरणावरून लक्षात येणे सुलभ जाईल.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले