संत किंवा गुरु यांच्या संदर्भात येणार्‍या अनुभूतींचे शास्त्र

साधकांना एखादे संत किंवा त्यांचे गुरु यांच्या संदर्भात अनुभूती येतात. त्या अनुभूतींची ते संत किंवा गुरु यांना बहुधा जाणीव नसते. अशा अनुभूती देवच ते संत किंवा गुरु यांच्यावर साधकांची श्रद्धा निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे रूप घेऊन देतो. क्वचित प्रसंगी संत किंवा गुरु स्वसामर्थ्याने अशा अनुभूती देतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले