साधकांनो, साधनेत एखादे पाऊल मागे पडल्यावर काळजी करू नका !

साधनेचा प्रवास २ – ३ पावले पुढे आणि एखाद पाऊल मागे, असा असतो. एखाद पाऊल मागे पडल्यावर त्याची काळजी करू नये. बसने प्रवास करतांना ती मधे मधे थांब्यावर थांबते. तेव्हा आपण काळजी करत नाही. ती पुढे जाणार आहे, याची आपल्याला खात्री असते. त्याचप्रमाणे साधनेत एखादे पाऊल मागे पडल्यावर साधना करणार्‍याने त्याची काळजी करू नये. तो पुढे जाणारच असतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले