१. वाईट वाटून घेऊ नका ! : एखाद्या वैद्यांनी एखाद्या रुग्णाला त्याच्या आजाराचे निदान सांगितले, तर त्याला आनंद होतो; कारण आता योग्य उपचार होऊन आपण बरे होऊ, अशी त्याला खात्री वाटते. त्याचप्रमाणे एखाद्याला कोणी त्याच्या चुका सांगितल्या, तर त्याला वाईट वाटण्याऐवजी बरे वाटले पाहिजे; कारण आता तो त्या चुकांवर मात करून साधनेत पुढे जाऊ शकतो.
२. वाईट वाटले पाहिजे ! : कोणी चूक दाखवल्यास थोडेतरी वाईट वाटले पाहिजे, तरच दोषावर मात करण्यासाठी प्रयत्न होतात. नाहीतर निर्ढावलेल्यासारखी स्थिती होते आणि चूक सुधारण्याचे प्रयत्न होत नाहीत.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले